लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : परतीच्या पावसाने कोरची तालुक्यातील बेतकाठी, बोटेकसा, कोठरी, मसेली, बेडगाव, बोरी, बेलगाव, कोटगूल परिसरातील धानाचे पीक जमिनीवर कोसळले आहे. बांधीतील पाण्यामुळे धान कुजायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. आॅक्टोबर महिन्यात थंडी पडण्यास सुरुवात होते. मात्र पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे. दमट वातावरणामुळे धानावर लष्करी अळी, खोडकिडा, मावा, तुडतुडा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरची तालुक्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने या तालुक्यात हलक्या व मध्यम कालावधीच्या धानाची लागवड केली जाते. मध्यम व हलके धान कापणी योग्य झाले आहे. मात्र याच वेळेवर पावसाने जोर धरला आहे. चार दिवसांच्या अंतरानंतर जोरदार पाऊस सुरू होत असल्याने काही शेतकºयांनी धानाची कापणी लांबणीवर टाकली आहे. वादळामुळे धान खाली कोसळले आहे. बांधित पाणी साचून राहत असल्याने कुजण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकºयांनी धान कापले आहे, अशा शेतकºयांच्या धानाच्या कडपा पाण्यात सापडल्या आहेत. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत सापडला आहे. अनेक शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा काढला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर त्याची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी नुकसानीचा पंचनामा करणे आवश्यक आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही या परिसरात एकही प्रशासकीय अधिकारी फिरकला नाही, याचा अर्थ येथील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाने धानपीक कुजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:49 PM
परतीच्या पावसाने कोरची तालुक्यातील बेतकाठी, बोटेकसा, कोठरी, मसेली, बेडगाव, बोरी, बेलगाव, कोटगूल परिसरातील धानाचे पीक जमिनीवर कोसळले आहे.
ठळक मुद्देकोरची तालुक्याला फटका : पीक नष्ट होताना शेतकºयांचे डोळे पाणावले