लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे.बुधवारी पावसाने उसंत दिली होती. त्यानंतर पुन्हा गुरूवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात शनिवारी ७७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रोवणीच्या कामांना मात्र वेग आला आहे. ३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ७४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७७७ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ५७.३७ टक्के पाऊस झाला आहे. ६५ मिमी पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यास अतिवृष्टी झाल्याचे समजले जाते. त्यानुसार गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.भागमरागडचा संपर्क तुटलेलाचभामरागड शहराजवळ असलेल्या पर्लकोटा नदीपुलावर शुक्रवारी सायंकाळी पाणी चढले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भामरागडचा संपर्क तुटलेलाच होता. छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस पडल्याने इंद्रावती नदीला पूर आला आहे. त्यामुळे पर्लकोटा व पामुलगौतम नदीला दाब निर्माण झाला आहे. परिमाणी पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. पुराचे पाणी वाढतच होते. ५० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. इंद्रावती नदी गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्याची दुभाजक आहे. छत्तीसगड राज्यातही अतिवृष्टी झाल्याने इंद्रावती नदी धोक्याच्या पातळीच्यावर वाहत आहे. गोदावरी नदीलाही पूर आला आहे. तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणाचेही पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठी व सकल भागात असलेल्या कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरवेला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडागट्टा, बोम्मेलकोंडा, सोमनूर ५० गावांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. वीज व मोबाईल सेवा खंडित होणार नाही.याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याने या दोन्ही सेवा सुरू आहेत.गोठा कोसळल्याने आष्टा येथील गाय ठारशनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टा येथील रामा श्रावण मोहुर्ले यांचा गोठा कोसळून एक गाय ठार झाली. त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. तसेच घरातील काही वस्तू मातीत दबल्याने नुकसान झाले. यामध्ये जवळपास ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आष्टा येथीलच रसिका विश्वनाथ कोकोडे यांचेही घर कोसळून स्वयंपाक घरातील वस्तू मातीत दबलेल्या आहेत. रसिका कोकोडे यांचे जवळपास १५ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सुखदेव शिम्पी यांनी पंचनामा केला. यावेळी डॉ. कापगते, माजी उपसरपंच प्रविण राहटे, उपसरपंच भारत वाटगुरे पंचनाम्याच्यावेळी उपस्थित होते.
नऊ तालुक्यांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:08 AM
शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे.
ठळक मुद्देपावसाचा पुन्हा जोर । नाल्यांच्या पुरामुळे अनेक गावांचे मार्ग बंद