ते कुरखेडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित धम्मसभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश मेश्राम तर मुख्य मार्गदर्शक जिल्हा संघटक हंसराज लांडगे होते. प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज सोसायटीचे प्रा. प्रभाकर मेश्राम, डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा नलीनी माने, भीमराव दहिवले, अशोक इंदुरकर, नारायन टेंभूर्णे, यशोधरा नंदेश्वर, डॉ. रामटेके, मंगेश कराडे, वनिता दहिवले, यादव सहारे, खेमराज बोरकर, देवेंद्र गेडाम, हिरालाल नंदेश्वर व रमेश मडावी आदी उपस्थित हाेते.
धम्मसभेत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेची दहा उद्दिष्टे जिल्हा मुख्य संघटक हंसराज लांडगे यांनी समजावून सांगितली. वर्षावासाचे महत्त्व, येणाऱ्या जनगणनेत बौद्ध म्हणून नोंद करणे, ३ ऑक्टोेबरला दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे आगमन आदी विषयावर विजय बन्सोड यांनी मार्गदर्शन केले.
बाॅक्स :
तालुका शाखा गठित
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची कुरखेडा तालुका शाखा गठित करण्यात आली. तालुका शाखेमध्ये अध्यक्षपदी भीमराव दहिवले तर सचिवपदी मंगेश कराडे यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये रोहिणी सहारे, श्रीराम राऊत, यादव सहारे, डॉ. जयदेव टेंभूर्णे, माधुरी ढवळे, अर्चना वालदे, मंगला बोरकर, गीता धारगावे, सुनील टेंभूर्णे, शालिक साखरे, हेमलता नंदेश्वर, लता सहारे, बळवंत कोटांगले, हिरालाल नंदेश्वर, वनिता पुळके, महेंद्र रामटेके, रमेश जोगे, पौर्णिमा टेंभूर्णे, ज्योती राऊत, शीतल भैसारे यांची तर सल्लागार म्हणून माणिक डोंगरे, नलिनी माने व नारायण टेंभूर्णे यांची निवड करण्यात आली. सभेचे संचालन भीमराव दहिवले तर आभार अशोक इंदूरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रकाश इंदूरकर, नानाजी जनबंधू, हिराबाई टेंभूर्णे व समाजबांधवांनी सहकार्य केले.
300821\0225img_20210830_174314.jpg
मार्गदर्शन करताना विजय बन्सोड