लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या वार्षिक सरासरी पावसाच्या अर्धा पाऊस २१ जुलैपर्यंत झाला आहे. आणखी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी एवढा पाऊस पडतो. २१ जुलैपर्यंत ६७०.५ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या ४९.५ टक्के पाऊस २१ जुलैपर्यंत झाला आहे. यावर्षी अगदी सुरूवातीपासून समाधानकारक पाऊस पडतो. जून महिन्यात सरासरी २०३.२ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी जून महिन्यात २५०.१ मिमी पाऊस झाला आहे. जून महिन्यातील सरासरीच्या १२३.१ मिमी अधिक पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात सरासरी ३३८ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात ४२०.४ मिमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातही सरासरीच्या १२४.४ मिमी पाऊस अधिक पडला आहे. १ जून ते २१ जुलैपर्यंत सरासरी ५४१.२ मिमी पाऊस पडायला पाहिजे. प्रत्यक्षात ६७०.५ मिमी पाऊस पडला आहे. आजपर्यंतच्या पावसाच्या सरासरी १२३.९ मिमी अधिकचा पाऊस पडला आहे.भामरागड तालुक्यातील नद्यांचा जलस्तर वाढलाछत्तीसगड राज्यात शुक्रवारी व शनिवारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे भामरागड तालुक्यातील पामुलगौतम, इंद्रावती नद्यांच्या जलस्तरात वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणजे, पर्लकोटा नदीच्याही पाण्यात वाढ झाली असून शनिवारी दुपारी पुलाजवळ पाणी पोहोचले.
पावसाने गाठली अर्धी वार्षिक सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:50 AM
गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या वार्षिक सरासरी पावसाच्या अर्धा पाऊस २१ जुलैपर्यंत झाला आहे. आणखी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देजूनपासून ६७०.५ मिमी पाऊस : आजपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत १२३.९ टक्के बरसला