गडचिराेली : गडचिराेली एसटी आगारात एकूण २०७ चालक व १८८ वाहक आहेत. दर दिवशी सुमारे २० हजार प्रवाशांशी त्यांचा संपर्क येेते. सध्या काेराेनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे एसटी चालक व वाहकांसाेबतच प्रवाशांनी एसटीमधून प्रवास करतेवेळी याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा काेराेनाचा उद्रेक पुन्हा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. तसेच दैनंदिन कामानिमित्त नागरिकही एसटीच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत. गडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. या बसेस जिल्हा तसेच दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवाशांची वाहतूक करतात. चालक व वाहक हे बसचे दाेन मुख्य कर्मचारी आहेत. लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये एकाच फेरीमध्ये शेकडाे प्रवाशी चढ-उतार हाेतात. तिकीट देण्याच्या माध्यमातून वाहकाचा प्रवाशांशी थेट संपर्क येते. पुढे हाच वाहक दुसऱ्या वाहनावर दुसऱ्या जिल्ह्यात किंवा जिल्ह्यातीलच दुसऱ्या तालुक्यात जाते. दुसऱ्या दिवशीसुद्धा शेकडाे प्रवाशांसाेबत संपर्क येते.
वाहकाला काेराेनाची लागण झाली असल्यास त्याच्यामुळे शेकडाे प्रवाशांना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासासाठी एसटी हे गरिबाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे एसटीच्या माध्यमातूनच अनेक प्रवाशी प्रवास करतात. त्यामुळे एसटी प्रशासनासह वाहक व चालकांनी याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
बाॅक्स .....
मास्क व सॅनिटायझर हाच उपाय
पूर्ण क्षमतेने प्रवाशी घेऊन एसटी चालविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. एका आसनावर एकच प्रवाशी बसविणे एसटीलाही परवडत नाही. त्यामुळे एकाच आसनावर दाेघाजणांना बसल्याशिवाय पर्याय नाही. गर्दी झाल्यास काही प्रवाशी उभे सुद्धा राहतात. परिणामी साेशल डिस्टंन्सिंग पाळणे शक्य नसल्याने काेराेनापासून बचाव करण्यासाठी ताेंडाला मास्क घालणे व नियमित सॅनिटायझरचा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.
बाॅक्स ...
चालक-वाहकांचे लसीकरण आवश्यक
आराेग्य कर्मचाऱ्यांनंतर आता महसूल, नगर पंचायत व पाेलीस कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक नागरिकांशी संपर्क येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना लस देणे आवश्यक आहे. यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे.
बाॅक्स .....
खासगी बसेसचे काय?
खासगी बसेससही दर दिवशी शेकडाे प्रवाशांची वाहतूक करतात. एसटीला ज्याप्रमाणे काेराेना प्रतिबंधात्मक नियम पाळयला लावले जाते. त्याचप्रमाणे खासगी बसमध्येही नियम असणे आवश्यक आहे. मात्र खासगी बसचालक सर्व नियम धाब्यावर बसवित असल्याचे दिसून येत आहे. त्यांनाही सक्ती करण्याची गरज आहे.
बाॅक्स ......
प्रवासीही बिनधास्त
काेराेना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने याेग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन एसटीमार्फत केले जात असले तरी बहुतांश प्रवासीसुद्धा काेणतेच नियम न पाळताच बसमधून प्रवास करतात. त्यांची या बेजबाबदार वागणुकीमुळे काेराेनाचा उद्रेक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काेट.....
काेराेनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना आगारातील ध्वनिक्षेपकावरून दिल्या जात आहेत. सूचना फलकही लावण्यात आले आहेत. मास्क असल्याशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, अशा सूचना चालक व वाहकांना दिल्या आहेत. - मंगेश पांडे, आगार प्रमुख, गडचिराेली
बाॅक्स ......
वाहक १८८
चालक २६०
राेजच्या फेऱ्या ६००