लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : राजा रावण आदिवासी समाजाच्या दृष्टीने पूजनीय आहे. राजा रावण हे दार्शनिक विद्वान, पराक्रमी राजा होते. मेळघाट, गडचिरोली, दक्षिण भारत, तसेच आदिवासी वास्तव्य असलेल्या भागात राजा रावण यांची परंपरेनुसार पूजा केली जाते. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करावी, अशी मागणी शहीद वीर बाबुराव शेडमाके समिती व आदिवासी महिला समितीच्या वतीने एसडीओ नितीन सदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असुन येथे प्रत्येक धर्माप्रती समानतेची वागणूक असतानासुध्दा या देशातील करोडो आदिवासी समाजाचे आदर्शाचे प्रतीक असलेले राजा रावण यांची जाहीर विटंबना केली जाते. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावतात. त्यामुळे रावण दहन बंद करावे, अशी मागणी समितीच्या वतीने एसडीओ, पोलीस निरीक्षक आष्टी, जि. प. सदस्य पंदिलवार, ग्राम पंचायत आष्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राजा रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:45 PM
राजा रावण आदिवासी समाजाच्या दृष्टीने पूजनीय आहे. राजा रावण हे दार्शनिक विद्वान, पराक्रमी राजा होते. मेळघाट, गडचिरोली, दक्षिण भारत, तसेच आदिवासी वास्तव्य असलेल्या भागात राजा रावण यांची परंपरेनुसार पूजा केली जाते.
ठळक मुद्देआदिवासी वास्तव्य असलेल्या भागात राजा रावण यांची परंपरेनुसार पूजा केली जाते.