नलिनीदिदी यांचे आवाहन : कुरखेडात राजयोग अभ्यास केंद्राचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शांतपणे जीवनमार्गाचा प्रवास करण्यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील आहे. जगण्याची धडपड करतानाच राजयोगाद्वारे जीवनात यशस्वी होता येते. राजयोग मानवाला जगण्याची कला शिकवितो, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या गडचिरोली सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका नलिनीदिदी यांनी केले. कुरखेडा येथे गीता पाठशालेच्या नवीन राजयोग अभ्यास व ध्यान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊराव बानबले, माजी जि. प. सदस्य राजेंद्रसिंह ठाकूर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाकाडे, माजी जि. प. सदस्य आशा कुमरे, कुरखेडा न. पं. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, माजी जि. प. सदस्य शोभाराणी सयाम उपस्थित होत्या. भगिनी महिला मंडळ कुरखेडा शेजारी गीता पाठशाला मागील १५ वर्षांपासून अविरत कार्यरत आहेत. याचा लाभ कुरखेडावासीयांनी घ्यावा, असे आवाहनही नलिनीदिदी यांनी केले. नि:शुल्क राजयोग मार्गदर्शन आत्मपरिवर्तनातून विश्व परिवर्तनाचा लाभ सर्वांना घेता येईल, असे आवाहन तलमले यांनी केले. संचालन गोवर्धन गहाणे तर आभार प्रकाश यांनी मानले.
राजयोग मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो
By admin | Published: June 26, 2017 1:15 AM