लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहिण-भावाच्या प्रेमाचा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण जिल्हाभर शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व सामाजिक संघटनेच्या वतीने घेण्यात आला.शहीद अजय उरकुडे स्कॉलर्स स्कूल, गडचिरोली - बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याची महती सांगणाºया रक्षाबंधन हा सण या शाळेत साजरा करण्यात आला. येथे सर्व मुलींनी मुलांना राखी बांधली. मुलांनीही बहिण माणून मुलींना चॉकलेट देऊन बहिणीविषयीचे प्रेम व्यक्त केले. रक्षण करण्याचे वचन यावेळी देण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष भावना देव्हारे होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता उरकुडे, शिक्षक सुनील शेरकी, वैशाली हस्तक, मनीषा बांगरे, मंगला लोणारे, वृषाली उमाटे, मेघा म्हशाखेत्री, सोनाली इष्टाम, राखी डोंगरे, मीना चिताडे, मंगला पगाडे आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी भावना देव्हारे यांनी सर्वांनी आपल्या कर्तव्याप्रती जागरूक राहावे, असे सांगितले.भगवंतराव आश्रमशाळा, भामरागड - भामरागड येथील भगवंतराव आश्रमशाळेतील विद्यार्थिनी व शिक्षकांनी सीआरपीएफच्या अधिकारी व जवानांना राख्या बांधल्या. यावेळी सीआरपीएफ बटालियन ३७ चे संचालक अशोक कुमार रियल उपस्थित होते. यावेळी आदिवासी विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठीही शुभेच्छा देत त्यांची सुरक्षा करण्याचे वचन सीआरपीएफ अधिकाºयांनी दिले.पोलीस स्टेशन, भामरागड - भामरागड पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भामरागड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंजली राजपूत, पोलीस उपनिरीक्षक राळेभात, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद महगडे, भूषण नैसाने, पत्रकार संघाचे अध्यक्ष इश्वर परसलवार, आदिवासी सेवक सब्बर बेग, आसिफ सुफी, रमेश बोलमपल्लीवार, सुनील बिश्वास, सोनी प्रसाद, शारदा कंबगोनीवार, सपना रामटेके आदी उपस्थित होते. यावेळी नव्याने रूजू झालेल्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांचा ग्रामस्थांना परिचय करून देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या हाताला महिला पोलीस कर्मचाºयांनी राखी बांधून बहिण-भावाच्या नात्यातील प्रेमाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन मेजर गलबले यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसानी यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठीत नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कै. चंद्रभागा मद्दीवार शाळा, अहेरी - अहेरी येथील कै. चंद्रभागा ल. मद्दीवार शाळेच्या वतीने प्राणहिता पोलीस कॅम्पमध्ये पोलीस जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सौरभ धरडे, गजानन पाटील, अमोल खडतरे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अजय देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक अजय देशपांडे यांनी सदर उपक्रमाचा हेतू सविस्तरपणे कथन केला. गेल्या १६ वर्षांपासून ही परंपरा जपत असून जवान व विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून राष्टÑीय भावना वाढीस लागावी, विद्यार्थ्यांमध्ये देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच देश सेवेत जुटलेल्या जवानांना प्रेमाचा स्नेहानुभव मिळावा, यासाठी हा कार्यक्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. गजानन पाटील यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन उपक्रम प्रमुख अभय भोयर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष जोशी यांच्या मार्गदर्शनात सुधाकर उमरगुंडावार, धनराज दुर्गे, राजू गग्गूरी, रूपाली गेडाम, उषा बोकडे आदींनी सहकार्य केले. यावेळी प्राणहिता पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवोदय प्रायमरी कॉन्व्हेंट, घोट - घोट येथील नवोदय प्रायमरी कॉन्व्हेंट, नवोदय मराठी उच्च प्राथमिक शाळा तथा हायस्कूल घोटच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राखी बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. सदर स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये प्राथमिक विभागातून रश्मी कर्मकार प्रथम, रोहित बर्मन द्वितीय तर संध्या बिश्वास हिने तृतीय क्रमांक पटकाविला. माध्यमिक विभागातून मोहिनी मेश्राम प्रथम, साक्षी कन्नाके द्वितीय तर ओम पिंपळे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होते.राखी मेकिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, राशी आयतुलवार प्रथमलोकमत बाल विकास मंच गडचिरोलीच्या वतीने रविवारी गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी राखी मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. या स्पर्धेत प्लाटिनम ज्युबिली हायस्कूलची विद्यार्थिनी राशी रवींद्र आयतुलवार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी धृव अरूण लांजेवार याने तर द्वितीय क्रमांक स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी काव्य राजेश मुरवतकर याने पटकाविला. सदर स्पर्धेमध्ये गडचिरोली शहरातील स्कूल आॅफ स्कॉलर्स, कारमेल हायस्कूल , प्लाटिनम ज्युबिली हायस्कूल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट आदी शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट राख्या तयार करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस प्लाटिनम ज्युबिली हायस्कूलचा विद्यार्थी सोहम पवन चिलमवार, द्वितीय बक्षीस गुरूकूल नागपूरचा आदीत्य दामोदर नैताम तर तृतीय प्रोत्साहनपर बक्षीस स्कूल आॅफ स्कालर्सची विद्यार्थिनी सृष्टी राजेश चुºहे हिने मिळविला. याशिवाय जान्वही राजकुमार कोमकवार, अथर्व अजय निंबाळकर या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष वंदना राजेश दरेकर, अमिता अरूणसिंह पवार आदी उपस्थित होत्या. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी जि. प. हायस्कूलचे प्राचार्य एस. चंदनगिरीवार यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी जंगावार, चिलमवार, निंबाळकर, नैताम व पालकांनी सहकार्य केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन व आभार लोकमत बालविकास मंच संयोजिका किरण राजेश पवार यांनी केले.सीमेवरील जवानांना पाठविल्या राख्यालोकमत सखी मंच व संस्कार भारतीच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज येथे सीमेवरील जवानांना राखी संदेश पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सीआरपीएफचे प्रमुख कमांडर तिवारी, विजय ठकराणी, कल्पना कापसे, नीमा रणदिवे, लांजेवार, चावके, बावनकर, प्रवीण पटले, रेखा नाकाडे, राधिका पत्रे, वैशाली पापडकर, गीता सूर्यवंशी, कल्पना गोवर्धन, किरण नगरकर, पिंकी ठकराणी यांच्यासह सीआरपीएफचे जवान उपस्थित होते. कुथे पाटील माध्यमिक विद्यालय मानवता, नगर परिषद कन्या शाळा प्रणतिक गर्ल, आंबेडकर स्कूल, आदर्श हायस्कूल तथा महाविद्यालय, महात्मा गांधी स्कूल यांच्या सहकार्याने सीमेवरील जवानांना देसाईगंज शहरातून दीड हजार राख्या व संदेश पाठविण्यात आले.
राखी बांधून दिला बंधुभावाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:37 AM
बहिण-भावाच्या प्रेमाचा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण जिल्हाभर शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व सामाजिक संघटनेच्या वतीने घेण्यात आला.
ठळक मुद्देजिल्हाभर रक्षाबंधन : शालेय विद्यार्थिनींसह सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकाºयांचा पुढाकार