शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

रक्षाबंधनातून मुंबईच्या विद्यार्थिनींनी जवानांचे मनोबल उंचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:40 PM

नक्षलवाद्यांसोबत लढणाऱ्या गडचिरोलीच्या पोलीस जवानांचे मनोबल वाढावे, यासाठी मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी सुमारे ६ हजार ५०० राख्या पाठविल्या. गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या माता, पत्नी यांनी या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस जवानांना बांधल्या.

ठळक मुद्देअनोखा उपक्रम : शहीद जवानांच्या माता व पत्नींनी बांधल्या राख्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांसोबत लढणाऱ्या गडचिरोलीच्या पोलीस जवानांचे मनोबल वाढावे, यासाठी मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी सुमारे ६ हजार ५०० राख्या पाठविल्या. गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या माता, पत्नी यांनी या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस जवानांना बांधल्या.गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस जवानांना नक्षलवाद्यांचा सामना करण्याबरोबरच येथील विपरित नैसर्गिक परिस्थितीशी सुध्दा झूंज द्यावी लागते. त्यामुळे येथील नोकरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या धोकादायक व कष्टप्रद आहे. अशाही परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस चांगले काम करीत आहेत. त्यामुळे येथील पोलीस जवानांबद्दल राज्यभरातील जनतेमध्ये आपुलकी आहे.मुंबई येथील एसएनएडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, कुलसचिव डॉ. दीपक देशपांडे यांच्या मार्गदर्शनात समाजकार्य आणि आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. आशा पाटील यांच्या नेतृत्वात ‘कृतज्ञता’ हा सामाजिक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत अमेय महाजन, अक्षित बक्षी, पुनम गायकवाड, मुनीरा यांनी विद्यार्थिनींकडून ६ हजार ५०० राख्या बनवून घेतल्या. या राख्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस जवानांना पाठविल्या. त्याअनुषंगाने गडचिरोली पोलीस मुख्यालयात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन १५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहीद पोलीस कर्मचाºयांच्या माता, पत्नीसह शालेय विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थितीत होते.

टॅग्स :PoliceपोलिसRaksha Bandhanरक्षाबंधन