जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. गावात अरुंद वाटेने जावे लागते.
त्यामुळे मातीमय रस्त्याचे खडीकरण हाेणार कधी? असा प्रश्न रमेशगुडम
परिसरातील नागरिकांनी केला आहे. झिंगानूर ते रमेशगुडम हे अंतर ८ किमी आहे. रमेशगुडम गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. या भागात मूलभूत साेयीसुविधांचाही अभाव आहे.
झिंगानूर परिसरातील रमेशगुडम, कर्जेली,
बोडूकस्सा, किष्टय्यापल्ली, कोर्लामाल, कोर्लाचेक आदी गावांमध्ये
जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना रस्त्याने
ये-जा करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अनेकदा
पक्के रस्ते निर्माण करण्याची मागणी केली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत
असल्याचे दिसून येते. झिंगानूर ते रमेशगुडम मार्गाने ब्रिटिशांच्या काळात
रस्ते होते, परंतु स्वातंत्र्याेत्तर काळानंतर या भागात रस्ते बांधकामाकडे
दुर्लक्ष करण्यात आले. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक पक्के रस्ते
बांधकामाची मागणी करीत आहेत. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे. मातीमय
रस्त्यानेच नागरिक प्रवास करीत असल्याने त्यांना माेठ्या प्रमाणात त्रास
सहन करावा लागताे.