लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ७६.८० टक्के लागला आहे. या शाळेतून अश्विनी देविदास उंदीरवाडे हिने ८२.८० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इशा नरेंद्र भोयर हिने ८०.४० टक्के गुण घेऊन द्वितीय तर आकांक्षा महेश बादेनवार हिने ७९.४० टक्के घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. याशिवाय या शाळेतून प्रण्तिा कडस्कर, हिरकन्या लाकडे, मैथिली मंगर, प्रतीक्षा जेंगठे, हिना सहारे आदी विद्यार्थिनी प्रावीण्यश्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष घनश्याम मडावी, शाळेच्या प्राचार्य एस. डी. चहांदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या शाळेतील प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थिनींचा शाळेतर्फे प्राचार्य सिंधू चहांदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षक विलास निंबोरकर, प्रा. देवानंद कामडी, पुरूषोत्तम ठाकरे तसेच अन्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
राणी दुर्गावती कन्या विद्यालयाचा निकाल ७६.८० टक्के
By admin | Published: June 14, 2017 1:55 AM