शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गडचिराेली जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला दुर्मीळ अर्धअल्बिनो डुरक्या घोणस; वनविभागाने केली नाेंद

By गेापाल लाजुरकर | Published: June 25, 2023 8:20 PM

जिल्ह्यात पहिल्यांदाच दुर्मीळ अर्ध अल्बिनाे डुरक्या घाेणस सापाची नाेंद वनविभागात झाली.

गडचिराेली : अर्ध अल्बिनाे प्रकारात साप तसे दुर्मीळच आहेत. त्यातही डुरक्या घाेणस प्रजातीत हा प्रकार अद्याप गडचिराेली जिल्ह्यात आढळलेला नाही. परंतु आरमाेरी येथे शनिवार २४ जून राेजी हा साप आढळून आला. जिल्ह्यात पहिल्यांदाच दुर्मीळ अर्ध अल्बिनाे डुरक्या घाेणस सापाची नाेंद वनविभागात झाली.

आरमोरी येथील नितीन गोंदोळे यांच्या घरी साप असल्याची माहिती येथील सर्प अभ्यासक देवानंद दुमाने यांना शनिवारी रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान फोनद्वारे मिळाली. त्यानुसार सर्पमित्र देवानंद दुमाने व त्यांची टीम गोंदोळे यांच्या घरी पोहाेचली. दुमाने यांनी सापाचे निरीक्षण केले असता सदर साप दुर्मीळ अर्ध अल्बिनो डुरक्या घोणस असल्याचे दिसून आले. सापाला सुरक्षितरित्या पकडण्यात आले. अर्ध अल्बिनो डुरक्या घोणस सापाला पकडल्यानंतर या सापाची नोंद वनविभागात करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी आरमोरी येथील वन्यजीव रक्षक देवानंद दुमाने, दीपक सोनकुसरे, करण गिरडकर, वसीम शेख, नितीन गोंदोळे उपस्थित होते.

सामान्य व अर्ध अल्बिनाेमध्ये फरक काय ?सामान्य डुरक्या घोणस मातकट चाॅकलेटी रंगाचा असतो. त्यावर बदामी रंगाचे आडवे, तिडवे पट्टे असतात. त्याचे तोंड चापट, निमुळते व शेपटी आखूड असते. शेपटीवर खवले असतात. शरीर जाड, डोळे बारीक, व बाहुली काळी असते. या दोन्ही प्रजातीत साम्यता असली तरी अर्ध अल्बिनाे डुरक्या घाेणस हा साप ‘ल्यूसिस्टिक स्नेक’ म्हणून ओळखला जातो. हा साप बिनविषारी असून त्याचा रंग पांढरा किंवा लालसर असताे, तर डोळे सामान्य सापाप्रमानेच काळे असतात. तोंडाचा भाग काळा असतो. शरीरावरील छटा स्पष्ट दिसून येत नाहीत. 

टॅग्स :snakeसापGadchiroliगडचिरोलीforest departmentवनविभाग