आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा, तालुकास्तरावर आंदोलने केल्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेत्यांचा महामोर्चा काढण्यात आला. मात्र सरकारच्या वतीने संघटनेच्या व दुकानदारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. त्यामुळे आता संघटनेने १ एप्रिलपासून धान्य न भरण्याचे व लाभार्थ्यांना वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था ठप्प होणार आहे.या संदर्भात सरकारी स्वस्त धान्य दुकान व केरोसीन दुकानदार संघटना गडचिरोलीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास शर्मा, जिल्हा सचिव अनिल भांडेकर, तालुकाध्यक्ष रामदास पिपरे आदी उपस्थित होते. संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाºयांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट व मुख्य सचिव महेश पाठक यांच्याशी केलेली चर्चा फिस्कटली त्यामुळे १ एप्रिलपासून बहिष्कार राहिल.
रेशनिंग व्यवस्था ठप्प होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:46 PM
जिल्हा, तालुकास्तरावर आंदोलने केल्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेत्यांचा महामोर्चा काढण्यात आला. मात्र सरकारच्या वतीने संघटनेच्या व दुकानदारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही.
ठळक मुद्देसंघटना आक्रमक : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन