लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील मालदुगी येथे दसºयानिमित्त पहांदी पारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघाच्या वतीने रावण महोत्सवाचे आयोजन शनिवारी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार खंडाते होते. उद्घाटन गोंगपाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे यांच्या हस्ते झाले. कोयापुनेम ध्वजारोहण पं. स. सदस्य संध्या नैैताम यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शक म्हणून अर्चना खंडाते, अॅड. उमेश मडावी, हरिभाऊ मडावी, रामचंद्र काटेंगे, रमेश कोरचा, प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक ह. म. कोटनाके, अॅड. श्रावण ताराम, गणेश वरखडे, नामदेव वट्टी, झनकलाल मंगर, कुमोटी, रवी कुळमेथे, संजय वड्डे, पोलीस पाटील यशोधरा नंदेश्वर, अविनाश पोईनकर, प्रा. ज्ञानेश्वर हलामी, देवाजी गोटा उपस्थित होते.आदिवासी बांधव प्राचीन काळापासून रावणाची पारंपरिक पूजा करतात, असे प्रतिपादन डॉ. खंडाते यांनी केले. याप्रसंगी अर्चना खंडाते, अॅड. उमेश मडावी, हरिभाऊ मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरूवातीला गावातून महारॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कैैलास कल्लो, प्रास्ताविक सी. आर. नैैताम तर आभार नंदकिशोर यांनी मानले. कुसन तुलावी, लीलाधर नैैताम, श्रीराम नैैताम, आकांक्षा नैैताम, रेशीम तुलावी, जीवन तुलावी, सीमा धुर्वे, योगिता मडावी, कैैलास नैैताम, अनिल तुलावी, अजय नैैताम, डिम्पल नैैताम यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.कन्हाळगाव येथे रावण महोत्सवपहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय गोटूल समिती कन्हाळगाव, गोंडियन सभा बहुउद्देशीय गोटूल समिती कन्हाळगाव तथा अखिल गोंडवाना गोंड महासभा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हाळगाव येथे गोंड राजा सम्राट रावण महोत्सव व शस्त्रपूजा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्य डी. के. मेश्राम, प्रकाश काटेंगे, डॉ. योगेश सोयाम, गोंगपाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे, रांगीचे पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, सुरपाम, अॅड. उमेश मडावी, दौलत बोगा, कालिदास पदा, भोजराज आत्राम, तिरूपती मेश्राम उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण पदा, संजय पदा, प्रदीप परसे, भोलेनाथ कल्लो, सचिन हलामी यांनी सहकार्य कले. यावेळी मोहली, चिंगली, निमगाव, मासिरगाडा, खिर्डी, रांगी येथील आदिवासीबांधव उपस्थित होते.
मालदुगी येथे रावण महोत्सव उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:04 AM
तालुक्यातील मालदुगी येथे दसºयानिमित्त पहांदी पारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघाच्या वतीने रावण महोत्सवाचे आयोजन शनिवारी करण्यात आले.
ठळक मुद्देमूर्तीची मिरवणूक : कोया पुनेम ध्वजारोहण; आदिवासी बांधवांसह वक्त्यांची उपस्थिती