लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : सर्वसामान्य व गरीब जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचा प्रचार, प्रसार करून लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले.भारतीय जनता पार्टी तालुका कोरचीच्या वतीने ११ आॅगस्ट रोजी कोरची येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आ.कृष्णा गजबे, प्रदेश सदस्य किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव विलास गावंडे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, कोरचीच्या नगराध्यक्ष ज्योती नैताम, देवराव गजभिये, आनंद चौबे, रामभाऊ लांजेवार, संजय बारापात्रे, बबलु हुसैनी, मदनलाल कवडीया, पद्माकर मानकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने खा.अशोक नेते यांचा शाल, श्रीफळ देऊन तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खा.अशोक नेते म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी आता शिक्षणाकडे वळून स्वयंरोजगार निर्माण करण्यावर दिला पाहिजे. आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपल्या कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले.
योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:45 PM
सर्वसामान्य व गरीब जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचा प्रचार, प्रसार करून लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले.
ठळक मुद्देखासदारांचे आवाहन : कोरचीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा