आदिवासी संस्कृतीचे यथार्थ दर्शन : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड, तेलंगणा राज्याला लागून आहे. या राज्यातील नागरिकांशी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा संपर्क येतो. अनेक ठिकाणी रोटी-बेटी संबंधही प्रस्थापित आहेत. कोरची तालुक्यातील कोटगूल भागात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे यथार्थ चित्रण घडविण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांपासून विद्यार्थी या नृत्यात सहभागी झाले होते. दिवाळीसारख्या सणातही आदिवासी बांधव नृत्य सादर करून आपल्या परंपरा व रूढी कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आदिवासी संस्कृतीचे यथार्थ दर्शन :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 2:25 AM