आरमोरीत चर्चासत्र : सर्वपक्षीय नेते सहभागीआरमोरी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व शिक्षण व्यवस्थेतील सध्यास्थितीतील वास्तव याबाबत आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात सर्व पक्षीय नेत्यांच्या सहभागाने चर्चासत्रात मंथन करण्यात आले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी होेते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. आनंदराव गेडाम, माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, भाकपचे जिल्हासचिव डॉ. महेश कोपुलवार, माजी पं. स. उपसभापती चंदू वडपल्लीवार, नायब तहसीलदार मेश्राम, जि. प. सदस्य लक्ष्मी मने, भारत बावथडे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे तालुका समन्वयक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, डॉ. गोपाल तामगाळे उपस्थित होते. चर्चासत्रात शैक्षणिक समस्या व उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मधुकर हिरापुरे, गुंफावार, वेणु ढवगाये, विजय ठवरे, राऊत, वडपल्लीवार, हेमलता वाघाडे, पाटील यांनीही विचार व्यक्त केले. संचालन डॉ. विजय रैवतकर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. पराग मेश्राम, किशोर हजारे, रमेश ठाकरे, शशिकांत गेडाम, डॉ. घोनमोडे, मोहन रामटेके, प्रा. मेश्राम, ठवरे यांनी सहकार्य केले.
शिक्षण व्यवस्थेतील वास्तवावर विचारमंथन
By admin | Published: October 30, 2015 1:44 AM