या एटीएममध्ये मागील दीड वर्षापासून गार्डच नाही. या एटीएमला बँक ऑफ इंडिया कोरची शाखेकडून रोख पैशांची रक्कम एटीमला पुरवले जातो मात्र एटीम खासगी कंपनीने किरायाने घेतले असल्याने याची सोई-सुविधांची जबाबदारी खासगी कंपनीच्या सुपरवायझरकडे आहे. या एटीममध्ये पैसे तर असतात; पण मात्र याची देखरेख रामभरोसे आहे.
काही महिन्यांपूर्वी या एटीएममध्ये अज्ञात व्यक्तीकडून येथील काचेची तोडफोडही करण्यात आली होती. याची तक्रार कोरची पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या एटीएमला सकाळी ५ वाजता उघडण्याची वेळ असून रात्री ११ वाजता नंतर बंद करण्याची वेळ आहे. मात्र गार्ड नसल्याने दीड वर्षापासून हे एटीम २४ तास रात्रीसुद्धा उघडेच राहते. कोरची तालुका गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकावर आदिवासीबहुल क्षेत्रात वसलेला तालुका असून या क्षेत्रातील अनेक ग्राहक अशिक्षित आहेत. या ग्राहकांना एटीएमचस वापर कसा करावे हेही कळत नाही. अनेकदा ग्राहकांकडून यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे या ठिकाणी गार्ड असले तर फसवणुकीपासून किंवा कुठलीही तक्रार असली तर समजावून सांगण्यासाठी गार्डची आवश्यकता आहे.
बँक ऑफ इंडिया शाखा कोरचीकडून एटीम ग्राहकांच्या खात्यामधून वार्षिक एटीएम मेंटेनन्स चार्ज म्हणून १५० रुपये व २७ रुपये जीएसटी पकडून एकूण १७७ रुपये चार्ज केला जातो. तसेच या एटीएममधूनसुद्धा तीनदा ट्रान्जेक्शन केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यामधून पैसे चार्ज केले जाते; मात्र एटीमकडून ग्राहकांना मिळणारी सुविधा काहीच नाही. जर ग्राहकांना स्वच्छता आणि या ठिकाणची सुविधा मिळत नसेल तर त्यांच्या ट्रान्जेक्शनमधून पैसे कसले कपात केले जातात, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. एटीएममध्ये असुविधांबाबत या एटीमला दिलेल्या खासगी कंपनीच्या मेंटेनेस करणाऱ्या सुपरवायझर छगन यांना फोन करून विचारणा केली असता ते म्हणाले की गार्डचा आमच्याकडे काहीच रोल नाही. ती बँक बघेल एटीममधील सोयी-सुविधांचा आपल्याकडे मेंटेनेस आहे त्याबाबत तुम्ही मला फोटो पाठवावे. मी वर पाठवेल असे त्यांनी फोनवरून सांगितले आहे.