लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात समाजाच्या सर्वांगीण विकासाठी केलेल्या कामाची जाणीव ठेवूनच केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने सामाजिक दायीत्वाचे भान ठेवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी केले.छत्रपती शाहू महाराज यांची १४४ वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणुन राज्यभर साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, राजेश पांडे, समाज कल्याण अधिकारी पेंदाम, सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, जात पडताळणी संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम, नगर परिषदेच्य महिला व बाल कल्याण सभापती रंजना गेडाम, नगरसेविका वर्षा बट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना अपर जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, आपली चूक आपल्याला दिसत नाही दुसऱ्याची छोटीशी चुक सुध्दा मोठ्या स्वरूपात दिसते. शासकीय कामकाज करीत असताना सकारात्मक विचार करुन झालेल्या गोष्टींचे परिमार्जन करीत न बसता चुकांमध्ये दुरुस्ती करुन कामे करावीत. आपण आपल्यावर सोपविलेले काम मनापासून केल्यास त्याचे समाधानही लाभेल, असे प्रतिपादन केले.यावेळी नगराध्यक्ष योगिता पिपरे म्हणाल्या, शाहू महाराजांनी बहूजन, उपेक्षित व वंचित समाजासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांचे कार्य समाजाने विसरु नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक नावाचे साप्ताहीक सुरु केले होते. काही कालावधीनंतर ते बंद पडले असता शाहू महाराजांनी आर्थिक मदत केल्यामुळे पुर्ववत साप्ताहिक सुरु झाले. महाराजांनी उपेक्षित व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील उपेक्षित लोकांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्यांचा आदर्श राज्यकर्ते व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी तसेच सामान्य नागरिकांनी ठेवावा, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, संचालन शिवाजी पाटील तर आभार माधुरी गवई यांनी मानले.वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा सत्कारनिवासी शाळा तसेच वसतिगृहातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तसेच निवासी शाळेचे मुख्याध्यापक व गृहपाल यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विजयमाला आकुदारी, स्वरुपा दुर्गे, मोनिका कारसपल्ली, गोवर्धन दुर्गम, उत्कर्ष मुंजामकर, अनिकेत दुर्गे, सचिन विलास सातपुते, श्रेणुशा कौशीक नागरे, मुख्याध्यापीका के.एम. हजारे, मुख्याध्यापक आर. पी. डुले, गृहपाल व्हि. पी. सोनटक्के, गृहपाल. अ. ज्ञा. जाधव यांचा रोख, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सेवा देताना सामाजिक दायित्वाचे भान ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:08 AM
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात समाजाच्या सर्वांगीण विकासाठी केलेल्या कामाची जाणीव ठेवूनच केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे.
ठळक मुद्देसामाजिक न्याय दिन : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन