सुट्टी असूनही नगर पंचायतीचा ताफा हजर : शोषखड्डे तयार करण्याचे नागरिकांना आवाहनएटापल्ली : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने राज्यभर जलमित्र अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून जल बचतीचा संदेश देण्यात येत आहे. लोकमतच्या या कार्यक्रमाला एटापल्ली नगर पंचायतीनेही पाठिंबा दर्शविला असून शुक्रवारी एटापल्ली गावात जलमित्र अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगर पंचायतपासून अर्धा किमी अंतर पायी चालून न. पं. च्या पदाधिकाऱ्यांनी एटापल्लीवासीयांना जलबचतीपासून संदेश दिला. त्यानंतर नल्लावार राईसमिलजवळ एटापल्ली शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली होती. ती दुरूस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, उपाध्यक्ष रमेश गंपावार, पाणीपुरवठा सभापती रमेश टिकले यांनी पुढाकार घेऊन हे अभियान एटापल्ली गावात राबविले. शासकीय सुट्टी असूनही न. पं. ची सर्व यंत्रणा शनिवारी या अभियानासाठी जातीने हजर होती. यावेळी नगर पंचायतीचे कर्मचारी आर. एम. गर्गम, एल. टी. दुर्गे, पी. पी. कपाटे, आर. एम. येरमे, के. एन. कागदेलवार, व्ही. जी. मोहुर्ले, एम. एस. गावतुरे यांच्यासह नगरसेविका दिपयंती पेंदाम, भारती इष्टाम, सगुना हिचामी, शारदा उल्लीवार, निर्मला कोनबत्तुलवार, किसन हिचामी, तानाजी दुर्वा, रेखा मोहुर्ले, ज्ञानेश्वर रामटेके, किरण लेकामी, योगेश्वर नल्लावार, दीपक सोनटक्के, रामजी मट्टामी, सुनीता चांदेकर, नामदेव दुर्गे, राहूल गावडे उपस्थित होते. यावेळी आगामी पावसाळ्यात घरोघरी शोषखड्डे तयार करण्यावर भर दिले जाणार असल्याने पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय वृक्षारोपण कार्यक्रमही एटापल्ली गावात घेण्याचा मनोदय व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्लीत लिकेजची झाली दुरूस्ती
By admin | Published: May 29, 2016 1:38 AM