लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक आदिनाथ दगडे यांनी १० नोव्हेंबर रोजी काढले आहेत.आदिवासी विकास मंत्री तथा आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष विष्णू सवरा हे २० व २१ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौºयावर होते. जिल्ह्यातील ८० टक्के धानाची खरेदी आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत केली जाते. त्यामुळे मंत्र्यांनी धान खरेदी संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना दिले होते. मात्र गांगुर्डे हे अनुपस्थितीत राहिले. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्टÑ नागरी सेवा (वर्तवणुक) नियम १९७९ मधील कलम ३ चा भंग केल्याने त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे महाव्यवस्थापक आदिनाथ दगडे यांनी काढलेल्या निलंबण पत्रात म्हटले आहे. निलंबनाचा आदेश १० नोव्हेंबर रोजी काढला असून विजय गांगुर्डे यांचा निलंबन कालावधीतील मुख्यालय प्रादेशिक कार्यालय नाशिक राहणार असल्याचे म्हटले आहे.गांगुर्डे यांची १३ आॅक्टोबर रोजी प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे प्रशासकीय बदली झाली होती. मात्र आदिवासी विकास महामंडळाने पुन्हा २६ आॅक्टोबर रोजी पत्र काढून गांगुर्डे यांची बदली केली होती.धान खरेदीतील गैरव्यवहार गांगुर्डेच्या मूळावरगांगुर्डे यांच्या कालावधीत धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील धान खरेदी केंद्रावर कोट्यवधी रूपयांच्या धानाची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणात कनिष्ठ कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले होते. मात्र एवढी मोठी चोरी कनिष्ठ कर्मचारी कसे काय करू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुरखेडा व कोरची तालुक्यातही धान खरेदीमध्ये कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. हेही निलंबणामागील कारण मानले जात आहे.
आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:16 PM
आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देमहाव्यवस्थापकांचे निर्देश : मंत्र्यांच्या बैठकीला गांगुर्डे यांची दांडी