सातबारा, गावनमुना ८(अ), आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, संमतीपत्र, मो. क्र. ही कागदपत्रे ठरवून दिलेल्या खरेदी केंद्राच्या ठिकाणी ११ ते ४ वाजेपर्यंत नोंदणी करण्यासाठी जमा करावे. सर्व शेतकऱ्यानी ई-पीक पाहणी अँपमध्ये स्वतःच्या शेतमालाची नोंद करूनच २०२१-२२ या सत्राकरिता सातबारा जमा करावे. प्राधान्यक्रमाने नंबर लागेल त्या शेतकऱ्यांना नियमानुसार संस्थेच्या माध्यमातून कळविण्यात येईल. असे आवाहन खविसचे अध्यक्ष गुरुदास चुधरी यांनी केले आहे.
चामोर्शी, गणपूर, कुनघाडा खरेदी केंद्रातर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी खविसच्या चामोर्शी कार्यालयात, येणापूर, सुभाषग्राम खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समिती उपबाजार कार्यालय चित्तरंजनपूर, आष्टी, गणपूर केंद्रांतर्गत शेतकऱ्यांनी बाजार समिती उपबाजार आष्टी, मुलचेरा, सुंदरनगर, मथुरानगर केंद्रांतर्गत शेतकऱ्यांनी उपबाजार समिती गोदाम विवेकानंदपूर,गडचिरोली केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी बाजार समिती गडचिरोली येथे सातबारा जमा करावे, असे चुधरी यांनी कळविले आहे.