गडचिराेली : काैशल्य विकास प्रशिक्षण देऊन बेराेजगारांना राेजगार उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा मुख्यालयी असलेल्या राेजगार व स्वयंराेजगार कार्यालय तसेच जिल्हा उद्याेग केंद्रातर्फे केले जाते. या दाेन्ही कार्यालयाअंतर्गत काेराेना काळात ४०० पेक्षा अधिक बेराेजगारांनी नाेंदणी केली. यापैकी १५० जणांना राेजगार उपलब्ध झाला आहे.
राेजगार व स्वयंराेजगार कार्यालयातर्फे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महा स्वयंम वेब पाेर्टल विकसित करण्यात आले आहे. या ऑनलाईन पाेर्टलवर राेजगार मिळविण्यासाठी सुशिक्षित बेराेजगारांना नाेंदणी करावी लागते. तर जिल्हा उद्याेग केंद्राकडे असलेल्या विविध याेजनेअंतर्गत कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य मिळविण्याकरिता प्रस्ताव सादर करावे लागते. या दाेन्ही कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास १५० युवकांना विविध ठिकाणी राेजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. दाेन्ही कार्यालयाच्या वतीने जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात काैशल्य विकास व राेजगाराबाबत भिंतीपत्रके, पाेस्टर व इतर माध्यमातून जनजागृती केली जाते.
बाॅक्स...
सीएमईजीपीतूनही बेराेजगारांना राेजगार
जिल्हा उद्याेग केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री राेजगार निर्मिती याेजना राबविली जाते. या याेजनेअंतर्गत मार्चपासून आतापर्यंत एकूण ११० बेराेजगारांचे ऑनलाईन पाेर्टलवर अर्ज प्राप्त झाले. यापैकी ९१ अर्ज व प्रस्ताव राष्ट्रीयकृत बॅंकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. फेब्रुवारीपर्यंत संबंधित लाभर्थी युवकांना सवलतीत कर्ज स्वरूपात रक्कम मिळणार आहे. या रकमेतून युवक स्वत:चा व्यवसाय सुरू करणार आहेत. मार्च महिन्यापूर्वी या कार्यक्रमाअंतर्गत बेराेजगारांचे एकूण ६५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यांना एक ते पाच लाख, पाच ते दहा लाखांपासून ५० लाखांपर्यंतची रक्कम कर्ज स्वरूपात प्राप्त झाली आहे. संबंधितांनीही स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहे.
बाॅक्स...
ऑनलाईन मेळाव्यात ६०० बेराेजगारांची नाेंदणी
काेराेना काळात जुलै व सप्टेंबर महिन्यात जिल्हास्तरावर ऑनलाईन राेजगार मेळावे घेण्यात आले. जुलै महिन्यातील मेळाव्यात १५० व सप्टेंबर महिन्यातील मेळाव्यात ४५० असे एकूण ६०० युवक, युवतींनी नाेंदणी केली. यापैकी ५० जणांना तातडीने राेजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. महा स्वयंम वेब पाेर्टल २४ तास सुरू राहत असून येथे नाेंदणी केली जात आहे. संस्था व उद्याेजकांशीही संपर्क ठेवून राेजगार देण्याचे काम केले जात आहे.
काेट...
राेजगार व स्वयंराेजगार कार्यालयामार्फत काैशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन युवक व युवतींना राेजगार मिळवून देण्याचे काम केले जाते. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय राेजगार मेळाव्यात जिल्ह्यातील १५२ युवकांनी नाेंदणी केली. जिल्ह्यात विविध ठिकाणी २०४ जागा रिक्त आहेत. यापैकी निम्या जागांवर युवकांची निवड झाली आहे. राज्यभरात अनेक कंपन्यांमध्ये ८० हजार जागा शिल्ल्क असल्याने तेथेही संधी मिळणार आहे.
- प्रवीण खांडरे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा राेजगार व स्वयंराेजगार कार्यालय, गडचिराेली
काेट...
आपण आयटीआय व अप्रेन्टीस शिक्षित असून काेराेनापूर्वी आपण जिल्ह्याच्या बाहेर एका कंपनीमध्ये कामावर हाेताे. काेराेना महामारीमुळे पुन्हा बेराेजगार व्हावे लागले. आता राेजगार व स्वयंराेजगार कार्यालय तसेच व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात जिल्हा उद्याेग केंद्राशी समन्वय ठेवून आहे. याेजनांबाबत माहिती मिळवून तसा अर्ज अलिकडेच सादर केला आहे. शासन व प्रशासनाच्या वतीने गडचिराेली जिल्ह्यात माेठे उद्याेग निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरून जिल्ह्यातील सुशिक्षित बेराेजगार युवकांना येथेच काम मिळण्यास मदत हाेईल.
- प्रवीण टेकाम, युवक