लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २०० वर महाविद्यालय संलग्नित असलेल्या स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला तब्बल दोन वर्ष दोन महिन्यानंतर नियमित कुलसचिव मिळाले. नियमित कुलसचिव म्हणून डॉ.ईश्वर मोहुर्ले ४ डिसेंबर २०१८ रोजी रूजू झाले आहेत.गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने कुलसचिव पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी २९ जुलै २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. अंतिम मुदतीपर्यंत कुलसचिव पदासाठी एकूण १८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. छाननीअंती यातील आठ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहे. पात्र ठरलेल्या १० उमेदवारांना १ डिसेंबर २०१८ रोजी मुलाखतीसाठी गोंडवाना विद्यापीठात बोलविण्यात आले. सदर मुलाखत प्रक्रियेला नऊ उमेदवार उपस्थित झाले. एक उमेदवार अनुपस्थित होता.महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली नियमित कुलसचिव निवडीसाठी समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये राज्यपाल नामनिर्देशित दोन सदस्य, व्यवस्थापन परिषदेतून राज्यपाल नामनिर्देशित एक सदस्य, कुलगुरू नामनिर्देशित एक मागासवर्गीय प्राध्यापक, व्यवस्थापक परिषदेतर्फे मॅनेजमेंट कॉन्सीलचा सदस्य असलेला एक सदस्य शिक्षण संचालकांचे एक प्रतिनिधी आदींचा समावेश होता. सदर निवड समितीचे सदस्य सचिव म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांचाही समावेश होता. समितीतील या सर्व लोकांनी कुलसचिव पदासाठी आलेल्या नऊ उमेदवारांची मुलाखत घेतली. गुणानुक्रमे डॉ.ईश्वर मोहुर्ले यांना इतर साऱ्या उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळाल्याने सदर निवड समितीने नियमित कुलसचिव म्हणून डॉ.मोहुर्ले यांची निवड केली.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विनायक इरपाते यांनी कुलसचिव म्हणून डॉ.मोहुर्ले यांना ४ डिसेंबर रोजी नियुक्ती आदेश दिले. याच दिवशी डॉ.मोहुर्ले हे कुलसचिव पदावर रूजू झाले. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध पदवी व पदव्यूत्तर विभाग, क्रीडा विभाग, ग्रंथालय, वसतिगृह व इतर बाबींचा कारभार सांभाळला जातो. विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासकीय कार्यवाही गतीने पार पडणे आवश्यक आहे. त्यादृष्टिकोनातून कुलसचिव पदाला महत्त्व आहे. गोंडवाना विद्यापीठाचे तत्कालीन पहिले कुलसचिव डॉ.विनायक इरपाते हे आॅगस्ट २०१६ रोजी रूजू झाले. तेव्हापासून या विद्यापीठाचे कुलसचिव पद प्रभारी अधिकाºयावरच होते.आजवर तीन जणांनी सांभाळला कुलसचिवपदाचा प्रभारविद्यापीठाचे तत्कालीन नियमित कुलसचिव डॉ.विनायक इरपाते यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर २५ आॅगस्ट ते २९ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ग्रंथालय विभागाचे डॉ.रोकडे यांनी सदर पदाचा प्रभार सांभाळला. त्यानंतर २८ आॅक्टोबर २०१६ ते १६ फेब्रुवारी २०१८ दरम्यान दीपक जुनघरे यांनी तर १७ फेब्रुवारी ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी कुलसचिव पदाचा कारभार सांभाळला.निवड प्रक्रियेचा तिढा सुटलामहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कुलसचिव पदाची निवड प्रक्रिया समिती गठित करूण पूर्ण करण्यात आली. सर्वदृष्टीने अधिक गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची कुलसचिव पदासाठी निवड करण्यात आली. आता गोंडवाना विद्यापीठाला नियमित कुलसचिव मिळाले आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.जी.डी.दुबे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
दोन वर्षानंतर मिळाले नियमित कुलसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:20 PM
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २०० वर महाविद्यालय संलग्नित असलेल्या स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला तब्बल दोन वर्ष दोन महिन्यानंतर नियमित कुलसचिव मिळाले. नियमित कुलसचिव म्हणून डॉ.ईश्वर मोहुर्ले ४ डिसेंबर २०१८ रोजी रूजू झाले आहेत.
ठळक मुद्देगोंडवानात नियुक्ती प्रक्रिया पूर्ण : प्राप्त १८ अर्जापैकी १० अर्ज ठरले पात्र