गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी व आष्टी परीसरातील वीजपुरवठा दिवसातून वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे येथील पाणीपुरवठा नियमित होत नसून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. खंडित वीजपुरवठयामुळे पाण्याची मोटार जळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खंडित वीज पुरवठयामुळे बँकेतील इंटरनेट सेवा प्रभावित होत असून नागरिकांना ताटकळत बसुन राहावे लागते. तसेच उन्हाळ्याचे दिवस असून विजेअभावी उष्णतेने नागरीक हैराण होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन आष्टी परीसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन अभियंता विंचूरकर यांना दिले. याप्रसंगी आष्टी ग्रा.पं. च्या सरपंच बेबी बुरांडे , माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य राकेश बेलसरे, ग्रा.प. सदस्य कपील पाल, सदस्य संतोष बारापात्रे, सदस्य छोटू दुर्गे, सूरज देवगडे, सूरज सोयाम, सूरज दुर्गे, परेश मोहूर्ले आदी उपस्थित होते.
आष्टी परीसरातील वीज पुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:37 AM