लाॅकडाऊनमुळे निराधार, गरीब व भूमिहीन महिलांना उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावत आहे. अधूनमधून मिळणारे काम बंद झाल्याने त्यांच्याकडील आर्थिक स्रोताचे मार्ग बंद झाले आहेत. रेगुंठा परिसरात अशाप्रकारे हलाखीचे जीवन काही महिला जगत असल्याची माहिती प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार परिसरातील विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे ठरविण्यात आले. पाेलीस उपनिरीक्षक जगदीश पालीवाल, विजय सानप व सागर पाटील यांनी पोलीस स्टेशन रेगुंठामध्ये दाखल आकस्मिक मृत्यूच्या नाेंदीवरून विधवा झालेल्या तसेच भूमिहीन महिलांची यादी तयार केली. त्यानंतर विधवा व गरजू महिलांना उपपाेलीस स्टेशनमध्ये बाेलावून अधिकाऱ्यांच्या हस्ते अन्नधान्याचा लाभ देण्यात आला. काेराेना संकटकाळात सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पाेलीस कर्मचारी उपस्थित हाेते.
बाॅक्स
काेटापल्लीच्या महिलेला वस्तू घरपाेच
कोटापल्ली येथील एक निराधार महिला अडचणीत आहे. परंतु ती पाेलीस ठाण्यात येऊ शकत नाही, ही बाब पाेलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच सदर महिलेला काेटापल्ली सरपंच यांच्या हाताने घरपाेच जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. रेगुंठा पाेलिसांचा हा सामाजिक उपक्रम पाहून काेटापल्लीची महिला भारावून गेली.
===Photopath===
210521\21gad_4_21052021_30.jpg
===Caption===
विधवा व निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना पाेलीस अधिकारी.