शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

पुलाने जोडले दोन राज्यांचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:36 AM

सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअहेरीवरून भोपालपटनमला थेट बस : महाराष्ट्र-छत्तीसगड बससेवेमुळे प्रवास सुकर

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यातील लोकांचे संबंध चांगले जुळले आहेत.सिरोंचा तालुक्यातून तेलंगणा राज्यातील निजामाबाद व छत्तीसगड राज्यातील जगदलपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग करण्यात येणार आहे. गोदावरी नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता छत्तीसगडच्या इंद्रावती नदीवर पुलाचे बांधकाम सध्या कासवगतीने सुरू आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या परिसरात पाणी अडवून लहानसा मार्ग काढण्यात आला असून छत्तीसगड-महाराष्ट्र अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या मार्गाद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बस थेट छत्तीसगडमधील भोपालपटनम येथे जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनीही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदा होत आहे. या मार्गे दररोज प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अहेरी उपविभागात यापूर्वी पातागुडमपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पावसाळावगळता उन्हाळा व हिवाळा अशा आठ महिन्यांच्या कालावधीत सुरू असायचे. तेव्हा पावसाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पुलाची निर्मिती झाल्याने तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू असल्याने महामंडळाची बसफेरी सुरू झाली आहे. परिणामी बसने प्रवास करीत लगतच्या राज्यात जाता येत आहे. दररोज या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास २०० वाहनांचे आवागमन होत आहे.भोपालपटनमचे तिकीट ८५ रूपयेमहाराष्ट्र-छत्तीसगड तसेच महाराष्ट्र-तेलंगणा अशी वाहतूक अहेरी उपविभागातून सुरू झाली आहे. अहेरी आगाराची बस सिरोंचावरून भोपालपटनम येथेही जात आहे. सिरोंचा ते भोपालपटनम हे ६७ किमीचे अंतर असून महामंडळाच्या बस तिकीट ८५ रूपये आहे. ८५ रूपयांमध्ये सिरोंचावरून भोपालपटनमला प्रवाशांना जात येत आहे. यापूर्वी अशा प्रकारची थेट प्रवासाची सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अहेरी उपविभागातील नागरिकांना छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पूर्वी पायी प्रवास करावा लागत होता. आता बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.