शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

बोरियावासीयांची नक्षल्यांच्या त्रासातून झाली मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:04 AM

भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले.

ठळक मुद्दे३९ नक्षलवादी ठार झाल्यामुळे गावकरी आनंदी : जेवण व इतर बाबींसाठी दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले. यामुळे बोरियावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून नक्षल्यांच्या खात्म्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचे दिसून येते.भामरागड तालुक्यातील बोरिया हे गाव इंद्रावती नदीजवळ आहे. छत्तीसगड राज्य व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे येणे-जाणे वर्षभर सुरू राहत होते. सभोवताल घनदाट जंगल असल्याने नक्षल्यांसाठी बोरिया हे गाव रेस्ट झोन बनले होते. याचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत होता. बºयाचवेळा बंदुकीच्या धाकावर जेवण मागितले जात होते. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासींना नक्षल्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. अनेकदा नक्षल्यांची संख्या ५० ते १०० च्या जवळपास असल्यास संबंधित नागरिकांच्या घरचे संपूर्ण एक महिन्याचे धान्य दोन ते तीन दिवसांतच संपत होते. एखाद्या नागरिकाने घरची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्यास बंदुकीचे टोक त्याच्या छातीवर ठेवले जात होते. गावात रस्ता व इतर सुविधा झाल्यास नक्षल्यांचे वास्तव्य अडचणीत येण्याची शक्यता असल्याने या गावात रस्ते व इतर सुविधा निर्माण होऊ नये, यासाठी नक्षली नेहमीच प्रयत्न करीत होते. परिणामी शासनाच्या योजना अजूनही या गावापर्यंत पोहोचल्या नसल्याचे वास्तव प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर दिसून येते.नक्षल्यांकडून होणारी मारझोड, हिंसक कृत्यांमध्ये गावातील नागरिकांना बळजबरीने भाग घ्यायला लावणे, गावात नाचगाणे करायला लावणे यामुळे गावातील नागरिक कायम दहशतीखाली जीवन जगत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यातील सर्वच नक्षलवादी पेरमिली दलमचे होते व ते बोरिया गावातील नागरिकांचा स्वत:साठी गैरवापर करीत होते. पोलीस दलाने सुमारे ३९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याने या गावातील नक्षलवाद्यांचा वावर जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बोरिया गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते.नक्षल्यांच्या विरोधामुळेच गावाचा विकास रखडलाभामरागड तालुक्यातील अनेक गावे जंगलात वसली आहेत. या गावांमध्ये प्रशासनाने प्रयत्न करून विविध योजना पोहोचविल्या आहेत. मात्र बोरिया हे गाव नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन बनले होते. आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये, यासाठी या गावात व गावाच्या जवळपास रस्ते निर्मितीस नक्षलवाद्यांचा नेहमीच विरोध राहिला होता.२२ एप्रिल रोजी बहुतांश नक्षलवादी ठार झाल्याची माहिती कळताच गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या अमानुष कृत्याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. या कारवाईमुळे या गावातील नक्षल्यांची दहशत संपणार आहे. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होईल.शहीद पोलिसांच्या कुटुंबियांनी २२ व २३ एप्रिलच्या घटनेबाबत सी-६० पोलीस जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी