२३ एप्रिल २०१५ रोजी येथील ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगर पंचायतीची स्थापना झाली; परंतु पाच वर्षे लोटूनही पाण्याची व्यवस्था जशीच्या तशीच आहे. ग्रामपंचायतीच्या काळात नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत; परंतु नळाला अतिशय कमी प्रमाणात पाणी येते व एकच वेळ पाणी येत असल्याने नागरिकांची पाण्याची गरज भागत नाही. मोजक्याच प्रभागांत नगर पंचायतीद्वारे पाण्याचे टँकर सुरू आहेत. इतर प्रभागांतील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, दोन वेळा नळाचे पाणी सोडले जात होते; परंतु यावर्षी मे महिना येऊनही एकदाच नळाला पाणी सोडत असल्याने शहरातील नागरिक नगर पंचायत प्रशासनाप्रति संताप व्यक्त करीत आहेत. नगर पंचायत प्रशासनाचे पाणी या मूलभूत समस्येकडे लक्ष कमी तर सिमेंट रोड व नाली बांधकाम करण्याकडे अधिक लक्ष असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.
धानोरा शहरात दोन वेळा नळाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:36 AM