लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : पालकमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्ट रोजी सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असताना पातागुडम या गावाला भेट देऊन नक्षल पीडित कुटुंबासोबत चर्चा केली. नक्षलपीडितांच्या समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन पालमंत्र्यांनी दिले.पातागुडम येथील संटी गोपय्या गोरगोंडा या इसमाची १५ फेब्रुवारी २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. संटी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले शेती करतात. एका मुलाला एसटी महामंडळात शासनाने कंडक्टरची नोकरी दिली आहे. सध्या कोरोनामुळे तो घरीच आहे. भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी संटी यांच्या पत्नी व मुलांसोबत चर्चा केली. त्यांना भेडसावत असलेल्या अडचणींची नोंद घेतली.गावकऱ्यांसोबत चर्चा करतेवेळी पालकमंत्र्यांनी नक्षलवाद्यांमुळेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात अडसर निर्माण झाला आहे. या भागाचा विकास करण्यावर शासन विशेष भर देणार आहे. गावकऱ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप केले जाईल. या वनहक्क पट्ट्यांच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. वनहक्क पट्ट्यांचे वितरण व तलावांची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हजर होते.
पालकमंत्र्यांच्या भेटीने नक्षलपीडितांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM
पातागुडम येथील संटी गोपय्या गोरगोंडा या इसमाची १५ फेब्रुवारी २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. संटी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले शेती करतात. एका मुलाला एसटी महामंडळात शासनाने कंडक्टरची नोकरी दिली आहे. सध्या कोरोनामुळे तो घरीच आहे. भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी संटी यांच्या पत्नी व मुलांसोबत चर्चा केली. त्यांना भेडसावत असलेल्या अडचणींची नोंद घेतली.
ठळक मुद्देवनपट्ट्यांचे आश्वासन : पातागुडम येथील नक्षलपीडित कुटुंब व गावकऱ्यांसोबत चर्चा