लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेतील शिक्षकांना बीएलओचे काम देण्याबाबत निवडणूक विभागाद्वारे प्रत्येक शिक्षकाला पत्र पाठविण्यात आले आहे. या कामातून शिक्षकांना भारमुक्त करावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवडणूक विभागाने १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने सर्व बीएलओला प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन मतदारांचा सर्वे करून विहित प्रपत्रात माहिती भरायची आहे. त्यासोबतच नमूना ६, ७, ८ व ८ अ आवश्यकतेनुसार भरून घ्यायचे आहे. शाळेचे काम सांभाळून ही सर्व कामे करावी, असे पत्र मिळाले आहे. सर्वेचे काम अतिशय व्यापक व किचकट आहे. त्यामुळे सर्वे करण्याबरोबरच अध्यापन करणे सुद्धा शक्य होणार नाही. सर्वेचे काम करायचे असेल तर शालेय कामातून भारमुक्त करावे, अशी मागणी केली आहे.निवेदनावर के.आर. साखरे, आर.जी. पेंदाम, एम.डी. शेडमाके, व्ही.बी. नंदनवार, विरेंद्र सोनवाने, रवींद्र उईके, श्रीपाद बन्सोड, आर.यू. पटले, प्रशांत असकरवार, रामटेके, सोनिया जुमनाके, मस्के, एस.जे. मने, मडावी, पित्तुलवार, धनगुण, भानारकर, चावरे यांच्या सह्या आहेत.स्पष्ट सूचनांअभावी गोंधळाची स्थितीप्रत्येक बीएलओला नेमक्या कोणत्या क्षेत्राचे सर्वे करायचे आहे, क्षेत्राचे सिमांकन कसे करावे, क्षेत्रातील सर्व मतदारांची नोंद घ्यावी की फक्त आपल्या मतदार यादीतील मतदारांची नोंद घ्यायची आहे. याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. त्यामुळे बीएलओमध्ये गोंधळ उडाला आहे.
बीएलओ नेमलेल्या शिक्षकांना भारमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:19 AM
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेतील शिक्षकांना बीएलओचे काम देण्याबाबत निवडणूक विभागाद्वारे प्रत्येक शिक्षकाला पत्र पाठविण्यात आले आहे. या कामातून शिक्षकांना भारमुक्त करावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवडणूक विभागाने १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित केला ...
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ३० नोव्हेंबरपर्यंत सर्वे