शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

स्थलांतरीत पक्ष्यांवर केले उपचार

By admin | Published: September 08, 2016 1:38 AM

तालुक्यातील वघाळा (जुना) या गावी चिंचेच्या झाडावर देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी वास्तव्यास आहेत.

वन्यजीव संरक्षण समितीचा पुढाकार : पक्षी संवर्धनासाठी वघाळावासीय सरसावलेआरमोरी : तालुक्यातील वघाळा (जुना) या गावी चिंचेच्या झाडावर देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी वास्तव्यास आहेत. या पक्ष्यांनी झाडावर अंडी घालून पक्ष्यांना जन्म दिल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून काही ठरावीक पक्षी चिंचेच्या झाडावरून खाली पडत आहेत, हे लक्षात आल्यावर पक्ष्यांना काही आजार आहे काय, हे तपासण्यासाठी वघाळा वन्यजीव (पक्षी) संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष्यांना आरमोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून त्यांची तपासणी केली.चिंचेच्या झाडावरून खाली पडलेल्या पक्ष्यांना उचलून वघाळावासीय त्यांच्यावर उपचार करीत आहेत. मंगळवारी सकाळी झाडावरून पडलेल्या दोन पक्ष्यांना वघाळा वन्यजीव (पक्षी) संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तपासणी व उपचारासाठी आरमोरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर पराते व औषधी संयोजक कर्णेवार यांनी पक्ष्यांवर उपचार केले. यावेळी वन्यजीव संरक्षण समिती वघाळाचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, विलास प्रधान, धनराज दोनाडकर, पांडुरंग आठवले, अशोक प्रधान, संतोष दोनाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)