मनाेज ताजनेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण जसजसे कमी होत आहेत तसतसे लोक बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. ४० टक्के लोक सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करीत असले तरी नियम न पाळणाऱ्यांची संख्या ६० टक्के आहे. एकीकडे अनलॉक प्रक्रियेतील पुढचा टप्पा गाठण्याचा विचार सरकार करत असताना बिनधास्तपणे वागणाऱ्या लोकांमुळे ‘डेल्टा प्लस’ या नवीन व्हेरिएंटला आमंत्रण मिळून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग कोरोनाची तिसरी लाट येणार हे गृहित धरून तयारीला लागला आहे. डेल्टा प्लस हा कोरोनाचा व्हेरिएंट आधीपेक्षा जास्त घातक आहे. त्यामुळे उपचारापेक्षा रोगापासून दूर राहण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र गडचिराेलीकर नागरिक त्याबाबत अजुनही गंभीर नसल्यामुळे कारवाई सुरू करणे गरजेचे झाले आहे.
वाहतूक शिपायासोबत नगर परिषदेचा माणूस द्याशहरातील वाहतूक नियंत्रण पोलिसांना कोरोनाच्या नियमांसाठी कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे चौकात ड्युटी करणाऱ्या वाहतूक नियंत्रक शिपायासोबत नगर परिषदेने आपल्या माणसाची ड्युटी लावून दिल्यास वाहतुकीसोबत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई करणे सोपे होऊ शकते. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे
मास्क नसणाऱ्यांवरील कारवाई थंडावली- गडचिरोली शहरात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी नगर परिषदेकडे दिली आहे.- दोन महिन्यांपूर्वीपर्यंत नगर परिषदेच्या पथकाने बऱ्याच प्रमाणात कारवाया करून दंडही वसूल केला आहे.- कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर नगर परिषदेच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाया बंद केल्या.
- तर कारवाई करणारकोरोनाची लाट कमी झाली असली तरी नागरिकांनी अजूनही नियमांचे पालन करायचे आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी मास्क लावूनच जातात. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. म्हणजे नागरिक मास्कशिवाय घराबाहेर पडणार नाही. तरीही लोक नियम पाळत नसतील तर पुन्हा दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल.- रवींद्र भंडारवारउपमुख्याधिकारी, न. प. गडचिरोली