ताडगाव येथे अंगणवाडी महिलांची बैठक सुनंदा बावणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. भामरागडसारख्या दुर्गम भागांत मोबाईल चालत नाही. बऱ्याचवेळा रेंज राहत नाही. असे असताना कार्यक्रमाचे फोटो माेबाईल ॲपमध्ये अपलाेड केले नाही. या नावाखाली ताडगाव तसेच मन्नेराजाराम सर्कलमधील २० अंगणवाडी महिलांचे दहा दिवसांचे मानधन काम करूनही कपात करण्यात आले. मोबाईलची वाॅरंटी मे २०२१ मध्ये संपली. याच नावाखाली अंगणवाडी कृती समितीच्यावतीने शासनाला मोबाईल परत करण्याची मोहीम सुरू झाली असताना फोटो टाकले नाही, या नावाखाली मानधन कपात करणे हे पूर्णत: गैर आहे. कपात करण्यात आलेले मानधन अंगणवाडी महिलांना काढून देण्यात यावे, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली.
२० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:44 AM