मानापूर/देलनवाडी : परिसरातील कोसरी (चव्हेला) येथे लघुसिंचन प्रकल्प बांधण्यात आला आहे. या सिंचन प्रकल्पाचा कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. सदर कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
चव्हेला लघुसिंचन प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर जमिनीला जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. कालव्याच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोहोचविले जाते. मात्र, कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होते. परिणामी, शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही. पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आपसात भांडणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाट दुरुस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आमदार, खासदार व मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन केली आहे, परंतु अजूनपर्यंत दखल घेण्यात आली नाही. शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नहर दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.