चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असलेला तालुका हा चामोर्शी आहे. तालुक्यात खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बरेच शेतकरी सकाळच्या सुमारास शेती मशागतीची कामे ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या बांधाची दुरुस्ती करण्याची कामे करीत असल्याचे दिसून येत आहे.
कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असून दिवसेंदिवस मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच चामोर्शी तालुक्यातील काही शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या बांधाची दुरुस्ती करणे, सपाटीकरण करणे, शेतजमीन समांतर करणे, उतार भाग खोल करणे, धूऱ्यावरील पाळे मजबूत करणे, लहान पाळ्यावर माती टाकून उंच व रुंद करणे आदी कामे सकाळच्या वेळेत ट्रॅक्टरच्या साह्याने केली जात आहेत.