निवेदनात म्हटले की, मुरखळा - कान्होली या गावाचे अंतर ३ किमी असून, दहा वर्षांपूर्वी सदर मार्गाचे खडीकरण करून डांबरीकरण करण्यात आले तेव्हापासून एकदाही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून असते. साचलेल्या पाण्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे. या मार्गावर मुरखळा येथील लोकमान्य विद्यालय असून, कान्होली गावातील विद्यार्थी या गावात शिक्षण घेण्यासाठी त्रास करून विद्यार्थी याच मार्गाने ये-जा करीत असतात. मुरखळा गावातील शेती या मार्गावर असून, दिवसभर वर्दळ असते तसेच तालुका ठिकाणी जाण्यासाठी कान्होली, कळमगाव, एकोडी, सगणापूर येथील नागरिक ये-जा करण्यासाठी या मार्गाचा अधिक वापर करीत असतात. या मार्गावर गडचिरोली आगाराची बससेवा सुरू होती मात्र रस्ता नादुरुस्त असल्याने गेल्या वर्षभरापासून बससेवा बंद आहे. मुरखळा गावातील शेती या मार्गालगत असल्याने पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी काटेरी फांद्याचे कुंपण केलेले आहेत. तसेच रस्त्याआड झाडे आल्याने रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे. त्यामुळे नादुरुस्त रस्त्याने आतापर्यंत एक विद्यार्थी व एका नागरिकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी तत्काळ या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना तालुका भाजप अध्यक्ष दिलीप चलाख, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, काशीनाथ बुरांडे, प्रतीक राठी, लोमेश सातपुते उपस्थित होते.
210821\img-20210821-wa0055.jpg
मुरखळा- कान्होली रस्ता फोटो