लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथील आंबेडकर चौकात मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाली होती. या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण झाले होते. तसेच धुळीचा त्रास वाढला होता. याबाबत लोकमतने ‘आंबेडकर चौकातील खड्डे कायम’ या शीर्षकाखाली ८ जूनला वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल प्रशासनाने घेतली असून गुरूवारी आंबेडकर चौकातील चारही मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून आष्टीची ओळख आहे. येथून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा जवळच आहे. अहेरी, गोंडपिपरी तसेच चामोर्शीकडे येणाऱ्या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आंबेडकर चौकातूनच ही वाहने वळतात. अवजड वाहनांमुळे या चौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती. खड्ड्यांमुळे धुळीचा त्रासही वाढला होता. वाहन जाताच धुरळा उडून परिसरात पसरायचा. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्याही निर्माण झाली होती. काही दिवसांतच पावसाचे आगमन होणार असल्याने या चौकातील खड्ड्यांची डागडुजी करणे आवश्यक होते. त्यानुसार गुरूवारी डागडुजी करण्यात आली. त्यामुळे वाहन धारकांना आता पावसाळ्यात त्रास होणार नाही. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत चामोर्शी ते आष्टी रस्त्याचे काम सुरु असून सदर काम कोनसरीपर्यंत पोहोचले आहे.महिनाभरात आष्टी येथील आंबेडकर चौकातील पूर्ण रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी सदर खड्डे बुजविण्यात आले आहे.
आंबेडकर चौकात डागडुजी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 5:00 AM
गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून आष्टीची ओळख आहे. येथून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा जवळच आहे. अहेरी, गोंडपिपरी तसेच चामोर्शीकडे येणाऱ्या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आंबेडकर चौकातूनच ही वाहने वळतात. अवजड वाहनांमुळे या चौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती.
ठळक मुद्देआष्टी येथे दुरूस्तीला सुरूवात : वाहनांच्या वर्दळीमुळे होता धुळीचा त्रास