शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Update : अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले, ​​आज पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भाजप १५०+ तर उर्वरित जागा मित्रांना! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत झाली चर्चा
3
Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधी भारतीय आहेत की विदेशी? उच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा
4
श्रीमंत बनायचं असेल तर 'ही' ट्रिक वापरा; इतका पैसा येईल की एकाचवेळी २ प्लॅट खरेदी कराल
5
"जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची..."; सुप्रिया सुळेंचा निशाणा
6
अग्रलेख : शाहांनी ठरविली रणनीती; विदर्भ आणि मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करण्यामागे कारणे
7
डोक्यातच गोळी का झाडली? सीआयडी करणार संजय शिंदेंची चौकशी
8
पावसाची जलदगती, लोकलची मंदगती; परतीच्या मान्सूनचे मुंबईत धुमशान, रस्ते-रुळ जलमय
9
कोट्यवधींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत १० जणांच्या टोळीला अटक
10
परतीच्या पावसाने महामुंबईला झोडपले; शहापूर, मुरबाडला वीज कोसळून दोघांचा मृत्यू
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात; बोलण्यावर संयम ठेवावा लागेल
12
वडिलांचा मित्र सांगून वृद्धाचा मुलीवर अत्याचार; वडाळ्यात ७० वर्षीय व्यक्तीला अटक
13
मुंब्रा बायपास बनलाय पोलिस ‘एन्काऊंटर झोन’! याच भागात सापडला होता मनसुख हिरेनचाही मृतदेह
14
‘त्या’ दोन गोळ्या गेल्या कुठे? हायकाेर्टाचा सवाल; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवतो; सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका
16
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणे आमची कमिटमेंट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
17
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
18
राज्यात पोलिस कोठडीत ८० आरोपींचा मृत्यू ; देशभरातील संख्या ६९७
19
ईडीने संशयित आरोपीची १४ तास चौकशी करणे शौर्याचे लक्षण नाही
20
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

दोन न.पं.सभापतींची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:57 AM

जिल्ह्यातील एटापल्ली व अहेरी नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबरला विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्देविषय समिती व स्थायी समिती : एटापल्ली व अहेरीत निवडणूक प्रक्रिया

ऑनलाईन लोकमत एटापल्ली/अहेरी : जिल्ह्यातील एटापल्ली व अहेरी नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबरला विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात काही सदस्यांची फेर निवड तर काही सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली.१७ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या एटापल्ली नगर पंचायतीत राकाँचे ३, भाजपचे ५, काँग्रेसचे ७, आविसंचा व अपक्ष प्रत्येकी १ सदस्य आहेत. यापैैकी भाजपच्या एका नगरसेविकेचे सदस्यत्त्व जात पडताळण्ीाच्या कारणाने रद्द करण्यात आले. त्यामुळे नगर पंचायतीत १६ सदस्य आहेत. गुरूवारी पार पडलेल्या विषय समितीच्या निवडणुकीत पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापती पदाकरिता काँग्रेसचे जितेंद्र दशरथ टिकले व भाजपचे दीपक सोनटक्के उभे होते. बांधकाम सभापती पदाकरिता काँग्रसेचे किसन झुरू हिचामी व भाजपच्या सुनिता मोहन चांदेकर उभ्या होत्या. या निवडणुकीत दोन्ही पदाकरिता काँग्रेसला १० व भाजपला ६ अशी मते मिळाली. पाणीपुरवठा सभापतीपदी टिकले व बांधकाम सभापतीपदी किसन हिचामी निवडून आले. तर उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्याकडे स्वच्छता व आरोग्य सभापतीपद कायम ठेवण्यात आले. विशेष म्हणजे महिला व बांधकाम सभापती पदासाठी कोणत्याच सदस्याने अर्ज न सादर केल्याने सदर पद रिक्त आहे.या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी काम पाहिले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.अहेरीत स्थायी समितीची निवडअहेरी नगर पंचायतीच्या विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक घेण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी ममता शैलेंद्र पटवर्धन यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच स्थायी समितीचेही गठन करण्यात आले. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, तर सदस्यपदी बांधकाम सभापती न. पं. उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, महिला व बालकल्याण समिती सभापती अर्चना विरगोनवार, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती नारायण सिडाम, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती स्मिता येमुलवार यांची निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एस. ओंबासे, सहायक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी काम पाहिले.