दुपारी १ वाजता तहसील कार्यालय कोरची येथे ही सोडत काढण्यात आली. यामध्ये स्त्री राखीव अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोटरा, नवेझरी, बोदालदंड, सातपुती, बेलगाव, जांभळी, मोठा झेलिया, पीटेसूर, कोसमी नं. २, सोनपूर, टेंमली, कोटगुल, मर्केकसा, आस्वलहुडकी, कोहका या १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच अनुसूचित जमातीकरिता (सर्वसाधारण) आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये मुरकुटी, मसेली, बेतकाठी, बिहिटेकला, कोचीनारा, अल्लीटोला, दवंडी, बोरी, नवरगाव, नांदळी, बेळगाव, बोगाटोला, अरमूरकसा, नागपूर या १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तहसीलदार छगनलाल भंडारी, निवडणूक विभाग अधिकारी बी. एन. नारनवरे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी व तहसील कार्यालयातील लिपिक यांनी २९ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत काढली. या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पक्षातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक आरक्षणाची सोडत झालेल्या प्रथम १८ ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये दिनांक १२ व १३ फेब्रुवारी या दिवशी दोन टप्प्यांमध्ये सरपंच, उपसरपंचांची निवड केली जाणार आहे.