लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाऱ्यां सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतून आता सर्वच्या सर्व म्हणजे १८४ विद्यार्थिनींनी काढता पाय घेतला आहे. दरम्यान निकृष्ट भोजन आणि महिला कर्मचारीच नसण्याचा मुद्दा वृत्तपत्रांमधून चव्हाट्यावर आल्यानंतर या विभागाने खडबडून जागे होऊन शाळेच्या प्राचार्याची दुसऱ्या शाळेत बदली केली. परंतु दुसरी महिला प्राचार्य आणि महिला अधीक्षिका नेमण्याबाबत अजूनही हालचाली झालेल्या नाहीत.ही निवासी शाळा सुरू झाली तेव्हापासून, महिला अधीक्षिकाच नसल्यामुळे या शाळेत असलेल्या विद्यार्थिनींची चांगलीच कुचंबना सुरू होती. परंतू तरीही हा प्रकार आतापर्यंत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभिर्याने घेतला नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थिनींच्या पालकांनी व काही सामाजिक संघटनांनी केली आहे. या निवासी आश्रमशाळेत १९ पैकी तब्बल १४ पदे रिक्त कशी राहिली? मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाबाबत अधिकाºयांना काहीच सोयरसुतक नाही का? असे प्रश्न पालक करत आहेत.
सर्वच विद्यार्थिनींनी सोडली निवासी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:09 PM
लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाऱ्यां सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतून आता ...
ठळक मुद्देप्राचार्याची बदली : महिला कर्मचारी व निकृष्ट भोजन प्रकरण