ग्रामसभा : ५० गावातील नागरिक हजरएटापल्ली : सूरजागड प्रकल्पामुळे तालुक्यातील जंगल नष्ट होणार असून स्थानिकांना मिळणारे वनोजपही पुढे मिळणार नाही, त्यामुळे शासनाने सूरजागड प्रकल्पासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून या प्रकल्पामुळे स्थानिकांना होणारे फायदे सांगावे, तोपर्यंत या प्रकल्पाचे काम थांबवावे, अशी भूमिका घेऊन गट्टा ग्रामसभेत ५० गावातील नागरिकांच्या उपस्थितीत प्रकल्पाविरोधात ठराव पारित करण्यात आला. गट्टा ग्राम पंचायतीत बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैैनू गोटा होते. सभेचे सचिव म्हणून ग्रा. पं. सचिव एल. बी. वाळके, प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच दोडगे गोटा, पोलीस पाटील कन्ना गोटा, मंगेश नरोटी, करपा हिचामी, सरपंच कल्पना आलाम, लटीया तेलामी, सैैनू महा, रामदास जराते, सरपंच रामा तुमरेटी, दुग्गे हिचामी, चंद्रा कवडो, मुरा हेडो, रामजी गुम्मा, प्रदीप हेडो, चंदू दोरपेट्टी उपस्थित होते. शासनाने वनहक्क दावे मंजूर करावे, पोलिसांनी स्थानिकांना त्रास देऊ नये, यासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
सूरजागड प्रकल्पाविरोधात गट्टा येथे ठराव पारित
By admin | Published: October 07, 2016 1:33 AM