शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

निराधारांचे अनुदान रखडले

By admin | Published: May 22, 2016 12:54 AM

निराधार नागरिकांना देण्यात येणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही.

तीन महिने उलटले : शासनाकडून अनुदानच प्राप्त झाले नाहीगडचिरोली : निराधार नागरिकांना देण्यात येणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले आहे. अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येते.निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना चालविल्या जातात. या योजनेंतर्गतच्या लाभार्थ्याला ६०० रूपये मासिक अनुदान दिले जाते. मात्र मागील तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. फेब्रुवारी महिन्यानंतर मानधन मिळणे बंद झाली आहे. मानधनाची रक्कम सरळ बँक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्व प्रथम बँकेमध्ये जाऊन अनुदानाविषयी विचारणा करीत आहेत. मात्र अनुदानच जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिक तहसील कार्यालयातही विचारणा करीत आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने बँकेमध्ये जमा करण्यात आले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सतत तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांच्या कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले आहेत. तत्काळ मानधन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले नाही. तिन्ही महिन्याच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा केले जाईल.- एन. डी. भुरसे, नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना), तहसील कार्यालय गडचिरोलीवाढीव अनुदानाबाबत पत्र नाहीनिराधार नागरिकांचे अनुदान ६०० रूपयांवरून वाढविण्यात आल्याची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी केली होती. मात्र अजुनपर्यंत वाढीव अनुदानाबाबतचे पत्र जिल्हास्थळावरील कार्यालयाला प्राप्त झाली नाही. त्यामुळे वाढीव अनुदानाबाबत नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पापासून अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे अनुदान नेमके किती वाढले, हे निराधार व अधिकाऱ्यांनाही माहित नाही. किमान जुने अनुदान तरी नियमितपणे देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.योजनानिहाय लाभार्थीयोजनेचे नाव                                         लाभार्थी संख्यासंजय गांधी निराधार अनुदान योजना                १८,२४८श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना       ५६,२९७इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना       ३३,८०३इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना     २,३७८इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना        ३,०५१                                     एकूण                 १,११,०७७