लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : सन १९०७ साली मुलचेरा येथे वनविभागाची विश्रामगृहाची इमारत उभारण्यात आली. सदर विश्रामगृहाची इमारत ही ब्रिटीशकालीन आहे. मात्र या इमारतीच्या देखभाल, दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ही इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे. त्यातल्या त्यात सदर विश्रामगृह परिसरातील झाडांना पाण्याची व्यवस्था नसल्याने ही झाडे वाढत्या तापमानामुळे करपण्याच्या मार्गावर आहेत.मुलचेरा शहराच्या मध्यभागी वनविभागाचे विश्रामगृह आहे. सदर विश्रामगृहाच्या एक एकर जागेच्या सभोवताल झाडे लावण्यात आली आहेत. या ठिकाणी पाणी व्यवस्थेसाठी बोअर मारण्यात आला आहे. मात्र मागील एक वर्षापासून हा बोअर बंद असल्याने येथील झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र अशा स्थितीत कर्मचारी व वनमजुरांच्या मदतीने येथे झाडांना पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विश्रामगृह परिसरात असलेली जिवंत झाडे करपण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे जगविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे ३३ कोटी वृक्ष लागवड योजना राबवून गावागावात झाडे लावण्याचे वनविभागाचे नियोजन आहे. परिणामी वृक्ष लागवड योजना हा निव्वळ फार्स ठरत आहे.गेल्या काही वर्षांत लावलेल्या झाडांचे चांगले प्रकारे संरक्षण व संवर्धन करून ही झाडे जगविणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे कानाडोळा करीत नवीन झाडे लावण्याचा वनविभागाचा प्रयत्न दिसून येत आहे. यात शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. वनविभागाच्या विश्रामगृह परिसरातील झाडांची पाण्याअभावी अशी अवस्था आहे तर इतर ठिकाणी लावलेल्या झाडांची काय अवस्था असेल, याची कल्पना न केलेली बरी. एकूणच वनविभागाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.
विश्रामगृह इमारतीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:30 AM
सन १९०७ साली मुलचेरा येथे वनविभागाची विश्रामगृहाची इमारत उभारण्यात आली. सदर विश्रामगृहाची इमारत ही ब्रिटीशकालीन आहे. मात्र या इमारतीच्या देखभाल, दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ही इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे.
ठळक मुद्देवनविभाग सुस्त : पाण्याअभावी परिसरातील झाडे मोजताहेत अखेरची घटका