शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:18 PM

केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देपुरातत्व विभागाकडे पाठपुरावा : सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरूवात झाली आहे.चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे अतिशय पुरातन मंदिरे आहेत. यातील मुख्य मंदिराचा वरचा भाग क्षतिग्रस्त झाल्याने मंदिराच्या गाभाºयात पावसाचे पाणी जमा होत होते. त्यामुळे मंदिर कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्याने सदर मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात यावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार पुरातत्व विभागाने जानेवारी २०१६ पासून मंदिरावरील दगड काढण्यास सुरूवात केली. सदर काम सहा महिने चालले. त्यानंतर मात्र या कामाकडे दुर्लक्ष झाले.मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी दिल्ली येथे जाऊन गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राज्य सरकारला निर्देश देण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह गजानन भांडेकर हे सुध्दा उपस्थित होते. या बैठकीनंतर मार्र्कंडेश्वर मंदिराच्या कामाला पुन्हा सुरूवात झाली. मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे. त्यानुसार नियोजन करून जीर्णोध्दाराच्या कामाची गती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी काम बंद पडल्यापासून दर १५ दिवसांनी पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्याकडे वर्षभर पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार अशोेक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांनी मदत केली. त्यामुळे पुन्हा मार्र्कंडेश्वर मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे जत्रा भरते. या जत्रेला देशभरातील हजारो भाविक येतात. त्यामुळे महाशिवरात्रीपूर्वी मंदिराचे काम अंतिम टप्प्याार्यंत पोहोचले असावे, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.