लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : साधारणत: नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात मिरची, वांगी, मेथी, पालक, कोथिंबीर, मूळा, गाजर या भाजीपाला पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही भाजीपाला पिके ऐन बहरात असताना कडाक्याची थंडी सध्या पडत असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. थंडीचा भाजीपाला पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे.आरमोरी तालुक्यातील वैरागड, मोहझरी, सुकाळा तसेच कुरखेडा तालुक्यातील कढोली परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. या गावातील भाजीपाला जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठेत विक्रीस नेला जातो. सध्या भाजीपाला पीक जोमात आहे. परंतु मागील तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने भाजीपाला पिकाची वाढ खुंटली आहे. या पिकाबरोबरच फुलकोबी, पानकोबीवर देठातील किडीचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरणामुळे झाला आहे. केवळ पिकांची वाढ खुंटली नाही तर थंडीमुळे शेतातील कामांवर परिणाम झाला आहे.सकाळी उशिरापर्यंत मजूर शेतातील कामावर जात नाही. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास सुटीच्यावेळी लवकरच घराची वाट धरतात. त्यामुळे शेतातील रबीची व उन्हाळी धान पिकातील मशागतीची कामे रेंगाळली आहेत.तुरीवर अळींचा प्रादुर्भावहलक्या प्रतिच्या तुरीच्या शेंगा पूर्णत: भरल्या असल्या तरी मध्यम व जड प्रतिच्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय रानटी श्वापदांकडूनही पिकाचे नुकसान होत आहे.
थंडीचा भाजीपाल्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:15 AM
साधारणत: नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात मिरची, वांगी, मेथी, पालक, कोथिंबीर, मूळा, गाजर या भाजीपाला पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही भाजीपाला पिके ऐन बहरात असताना कडाक्याची थंडी सध्या पडत असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.
ठळक मुद्देवाढ खुंटली : शेती कामावरही परिणाम;कोबी पिकावरही किडीचे आक्रमण