बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनीषा मडकाम हाेत्या. मार्गदर्शक म्हणून संघटनेचे प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून मुन्नी शेख किमान वेतन कोणालाही दिले जात नाही. जाेपर्यंत किमान वेतन २१ हजार रुपये तसेच विविध भत्ते व पेन्शन लागू हाेत नाही, ताेपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटणार नाही, असे सांगितले. प्रा. दहीवडे म्हणाले, गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मदतनिसांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्यात आल्या नाही. अनेक अंगणवाडीसेविकांकडून मोबाइल दुरुस्तीच्या नावाखाली ४ ते ५ हजार रुपये घेण्यात आले. काम करूनही ताडगाव तसेच मन्नेराजाराम सर्कलमधील ४० अंगणवाडीसेविकांचे १० दिवसांचे मानधन कपात करण्यात आले. बेकायदेशीररीत्या कपात करण्यात आलेले मानधन देण्यात यावे. बैठकीचे आभार वत्सला वेलादी यांनी मानले. यावेळी नीता दुर्गे, उषा पुंगाटी, सावित्री मट्टामी, कमल पुंगाटी, वनिता कवंडे, रमी पुंगाटी, नंदा दहागावकर, शोभा बत्तुलवार, ललीता कुमरे, ललीता कुड्यामी, माया कोडापे उपस्थित होते.
‘त्या’ अंगणवाडीसेविकांचे कपात केलेले मानधन परत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:40 AM