लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : दीपावली सणानंतर रब्बी पिकाच्या पेरणीला जोमात सुरुवात होत असते. धानपट्ट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.कमी मुदतीच्या हलक्या प्रतीच्या धानपिकाच्या कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. धानपिकाची कापणी झाल्यानंतर परतीच्या पावसाचा ओलावा शेतजमिनीत कायम असल्याने शेतकरी लाखोळी, मूग, उडीद या बियाणांची पेरणी करीत असतात. या पिकाच्या पेरणीसाठी नांगरणीची गरज नसल्याने मोठ्या प्रमाणात या पिकांची लागवड होणार आहे. खरीप हंगामातील धानपिकाच्या कापणीचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर शेतकरी रब्बीच्या पिकांकडे वळतात. हरभरा, जवस, कोथिंबीर तसेच नांगरणी करून घेतले जाणारे कडधान्य यांची पेरणी सुरू होते. मात्र पावसाचा जोर पोळ्यानंतर सप्टेंबर महिन्यातच ओसरत असल्याने इतर वर्षात रब्बीच्या नांगरणीसाठी ओलावा मिळत नाही. मात्र यंदा परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्यातही दमदार हजेरी लावल्याने रब्बीच्या नांगरणीसाठी या पावसाचा फायदा होणार आहे. आरमोरी तालुक्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी होणार आहे. तेलगर्वीय महत्त्वाचे पीक असलेल्या भूईमुगाची पेरणी झाली असून हे पीक उगविले आहे.
परतीच्या पावसाचा रब्बी पिकाला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:34 AM
दीपावली सणानंतर रब्बी पिकाच्या पेरणीला जोमात सुरुवात होत असते. धानपट्ट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार असल्याची शक्यता....
ठळक मुद्देशेतकºयांची लगबग : ४ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन