गडचिरोली : शासनाने गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ५९ लाख १० हजारांचे वाहन नोंदणी, नूतनीकरण व इतर बाबी अंतर्गत महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओ कार्यालयाला एप्रिल ते जानेवारी २०१६ या १० महिन्यांच्या कालावधीत एकूण १ कोटी ३९ लाख १४ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. वर्ष संपण्यापूर्वीच आरटीओ कार्यालयाने शासनाने दिलेल्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे. आरटीओ विभागाने प्राप्त केलेल्या महसुलामध्ये समझोता शुल्क, जुने तसेच नवीन वाहनापासून मिळालेल्या कराचा समावेश आहे. याशिवाय आरटीओ विभाग व गठित करण्यात आलेल्या पथकाने गृहराज्य व आंतरराज्यीय शुल्काचा समावेश आहे. आरटीओ विभागाने ८८.८२ लाखांचा महसूल गृहराज्य व ५०.३५ लाख रूपये आंतरराज्यीय महसूल प्राप्त केला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून इतर राज्यांना जोडणारे मार्ग जातात. त्यामुळे इतर राज्यातील वाहनांचे आवागमन गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होत असते. आरटीओ विभागाच्या वतीने इतर राज्यातील वाहनधारकांकडून ५० लाख ३५ हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवीन वाहनधारक आरटीओ कार्यालयात जाऊन सर्व शुल्क अदा करून आपल्या नव्या वाहनाची नोंदणी करीत असतात तसेच जुने वाहनधारकही आपली नोंदणी व परवाना नूतनीकरण दरवर्षी करतात. या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला लाखो रूपयांचे उत्पन्न मिळते. (स्थानिक प्रतिनिधी)जुलै महिन्यात सर्वाधिक महसूलउपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ या १० महिन्यांच्या कालावधीत एकूण १ कोटी ३९ लाख १४ हजार रूपयांचा महसूल प्राप्त केला. यामध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक २१ लाख २१ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिल महिन्यात १५ लाख ४२ हजार, मे महिन्यात १६ लाख ७ हजार, जून ११ लाख ८६ हजार, आॅगस्ट १३ लाख २५ हजार, सप्टेंबर १३ लाख ६७ हजार, आॅक्टोबर १३ लाख ९८ हजार, नोव्हेंबर १५ लाख ८३ हजार, डिसेंबर, ११ लाख ७४ हजार व जानेवारी महिन्यात ६ लाख ११ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नियम तोडणाऱ्या ८४५ वाहनधारकांकडून ५ कोटी ८१ लाखांचा दंड वसूलउपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वायुवेग पथकाने प्रमुख मार्गावर गस्त घालून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकूण ८४५ वाहनधारकांकडून एप्रिल २०१५ ते फरवरी २०१६ या ११ महिन्यांच्या कालावधीत एकूण ५ लाख ८१ हजार ५०५ रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये अवैध प्रवासी वाहन व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.आरटीओ विभागाच्या वतीने जुन्या व नव्या वाहनधारकांकडून कराच्या रूपात १ कोटी ३९ लाख रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. तसेच अवैध प्रवासी वाहनधारकांकडून ५ लाख ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात १ लाखांच्या वर दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. अवैध वाहनधारकांच्या विरोधात कारवाई सत्र सुरू आहे. - शांताराम फासे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली
आरटीओला सव्वा कोटींवर महसूल गतवर्षीपेक्षा यंदा महसुलात वाढ
By admin | Published: March 14, 2016 1:19 AM