सर्वप्रथम त्यांनी छत्तीसगड सीमेवर तैनात असलेल्या ११३ बटालियन आणि गोडलवाहीमध्ये तैनात कॅम्पच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सैनिकांना भेटले, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना लवकरच दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जारावंडीमध्ये तैनात १९२ बटालियनच्या कंपनीत सैनिकांसोबत रात्री मुक्काम केला. धानोराच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यांनी जवानांचे निवास, भोजनालय यासह शिबिराच्या सुरक्षेचा आढावा घेतला. शिबिराच्या भेटीदरम्यान, युनिट एमआय रूममध्ये दाखल झालेल्या आजारी जवानाच्या तब्येतीची चौकशी केली.
सीआरपीएफच्या वतीने करण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे काैतुक केेले. बदलत्या नक्षल डावपेचांच्या अनुषंगाने, परिसरातील नक्षलविरोधी कारवायांचा आढावा घेतला. कमांडंट जी.डी. पंढरीनाथा यांनी परिसरात राबविल्या जाणाऱ्या मोहिमा आणि सिविक ॲक्शन कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. सीआरपीएफ येरकड कंपनीमधील सैनिकांसोबत रात्री मुक्काम केला आणि शिबिरात सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला. यावेळी बटालियनचे द्वितीय कमांडिंग अधिकारी राजपाल सिंह, कुलदीप सिंग, डीसी प्रमोद सिरसाठ, सहायक कमांडंट रोहताश कुमार आणि डीआयजी स्टाफ ऑफिसर सुमित सिंह इत्यादी अधिकारी व जवान उपस्थित होते.
200921\3029img-20210920-wa0018.jpg
सीआरपीएफ चे आय जी गार्ड आफ आणर स्वीकारताना